आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वैमनस्यातून युवकाची हत्या, सहा जणांविरुद्ध गुन्हे, दोघांना केली अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माताखिडकी परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाचा परिसरातीलच सहा जणांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी (दि. १७) रात्री १० वाजताच्या सुमारास गडगडेश्वर मंदिर मार्गावर घडली. हा खून जुन्या वैमनस्यातून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखा पाेलिसांनी रविवारी रात्री दोघांना अटक केली आहे.

विजय मारोतराव जाधव (३०, रा. माताखिडकी, अमरावती), असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोपाल तायडे, दिगांबर वाघमारे, बजरंग अडायके, विजू वाळसे, सुरेश स्वर्गे अर्जुन इंगोले या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री विजय हा त्याचा पुतण्या राहुल राजेश जाधव याच्यासोबत दुचाकीने जात होता.
हे काका पुतणे गडगडेश्वर मंदिराच्या भागातून हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने जात असताना बजरंगने लोखंडी पाइप दुचाकीच्या दिशेने फेकला. यामुळे दुचाकीवरील राजेश विजय दोघेही खाली कोसळले. त्याच वेळी उर्वरित मारेकऱ्यांनी या दोघांच्या दिशेने धाव घेऊन विजयवर चाकूने हल्ला केला तसेच काहींनी लोखंडी पाइपने मारहाण केली. याच वेळी विजयवर दगड टाकण्यात आले. दरम्यान, विजयवर पाच ते सहा जणांनी हल्ला केल्यामुळे राजेश हा घरी सांगण्यासाठी आला तातडीने नातेवाइकांना घेऊन घटनास्थळी पोहोचला. या वेळी विजय रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याला उचलून इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, राजेश जाधवच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती खोलापुरी गेट पोलिसांनी दिली आहे.

विजयनेमारली होती गोपालला तलवार : शनिवारीदुपारी विजय जाधव गोपाल तायडे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन विजयने गोपालच्या हातावर तलवारीने हल्ला केला होता.

एका प्रकरणात विजयने सांगितले होते दोघांचे नाव
नऊ महिन्यांपूर्वी एका खून प्रकरणात विजयने दोघांबाबत पोलिसांना माहिती दिली होती. तेव्हापासूनच गोपाल विजय यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. याचा वचपा काढण्यासाठीच विजयला संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज असल्याचे ठाणेदार कुमार आगलावे यांनी सांगितले.