आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशेची लाच घेताना लिपिकाला पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शासकीय कंत्राटदाराचा परवाना काढून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. मुदलीयारनगरात राहणारे सुरेंद्र गावंडे (५२) असे एसीबीने पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर प्रकरणात एसीबीने आरोपी गावंडेवर गुन्हा दाखल केला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय कंत्राटदाराचा परवाना या विभागातून दिला जातो.
यासंदर्भात ऑनलाइन अर्ज करून हा परवाना कंत्राटदाराला दिला जातो. दरम्यान, तक्रारकर्त्याने शासकीय परवाना मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. यासाठी ऑनलाइन अर्ज भरून त्यांनी ही प्रक्रिया केली. दरम्यान, सदरची प्रक्रिया तत्काळ करून परवाना काढून देतो, यासाठी पाचशे रुपये द्यावे लागेल, अशी मागणी वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत सुरेंद्र गावंडे याने तक्रारकर्त्याकडे केली. दरम्यान, एसीबी पथकाने सापळा रचून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना गावंडे यांना रंगेहात पकडले. सदर कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक एम. डी. चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक देशमुख, पोलिस उपअधीक्षक आर. बी. मुळे, पोलिस उपअधीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आत्माराम इंगोले, राहुल तसरे, विनोद दाभणे, श्रीकृष्ण तालन, विशाल हरणे, धीरज बिरोले, जाकीर खान तुषार देशमुख यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...