आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट \"आरसी\'द्वारे चोरीच्या दुचाकींचा होतोय ‘व्हाइट सेल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दुचाकीचोरी करायची आणि ती विकायची, तर पोलिस पकडण्याचा धोका राहतो शिवाय अशा दुचाकींच्या विक्रीतून रक्कमही कमी येते म्हणून शातीर आरोपींनी चोरीच्या दुचाकींची खऱ्या आरसी प्रमाणे (रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र) स्मार्ट कार्ड (आरसी) तयार करायची ती चोरीची दुचाकी घामाच्या कमाईची असल्यागत ‘व्हाइट' पद्धतीने विक्री करायची, असा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू केला आहे. हे प्रकरण नुकतेच ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले असून, हे रॅकेट मोठे असल्यामुळे पोलिसांचे या प्रकरणात खोलवर जाऊन माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथून एका युवकाची दुचाकी संशयाच्या आधारे जप्त केली. ती दुचाकी जप्त करण्यासाठी गेलेले पोलिस पथक पहिल्यांदा रिकाम्या हातानी परत आले. कारण या युवकाने पोलिसांना त्याच दुचाकीची आरसी दाखवली. या आरसीवर असलेला (एम. एच. २७ एव्ही- ३६१९) हाच क्रमांक दुचाकीच्या नंबर प्लेटवर होता. त्यामुळे आपली माहिती चुकीची असावी, असा पोलिसांचा समज झाला होता. मात्र, पोलिसांनी (एम. एच. २७ एव्ही- ३६१९) या क्रमांकाची आरटीओ कार्यालयाकडून माहिती काढली, तर या क्रमांकाची दुचाकी यावली शहीद येथील सुनील वानखडे यांच्या नावाने रजिस्टर आहे. त्यामुळे पोलिस पुन्हा घाटलाडकीला गेले त्यांनी त्या दुचाकीची बारकाईने पाहणी केली. त्या दुचाकीमालकाने दाखवलेली आरसी पडताळणी केली. त्या वेळी खरा घोळ लक्षात आला. या दुचाकीच्या चेसिस इंजिन क्रमांकाचे दुचाकीवर असलेले अंक आरसीवर असलेले अंक यामध्ये एक एक अंक कमी टाकण्यात आला होता. हा अतिशय नाजूक शिताफीने केलेला बदल प्रथमदर्शनी कोणालाही लक्षात येणारा आहे. घाटलाडकीवरून जप्त केलेल्या दुचाकीवर असलेला इंजिन क्रमांक (एचए १० ईजेसीएचके २९५३९) असा असून, तो बनावट आरसीवर ‘एचए१०ईएलसीएचके २९५३९' असा आहे. यामध्ये सर्व अंक अक्षर सारखे असून केवळ ‘जे' च्या जागी ‘एल' लिहिण्यात आला आहे. तसेच दुचाकीवर चेसिस क्रमांक ‘एमबीएलएचए १० एएमसीएचके ७०२५०' हा असून आरसीवर ‘एमबीएलएचए १० एमसीएचके ७०२५०' टाकण्यात आला आहे. आरसीवरील क्रमांकामधून केवळ ‘ए' हे अक्षर कमी करण्यात आले आहे. याचवेळी आरसीचे स्मार्ट कार्ड मात्र ज्या पद्धतीने आरटीओकडून देण्यात येते, त्याच पद्धतीने आहे. त्या आरसीवर असलेली डाटा चिपसुद्धा ओरिजनल असल्यासारखीच दिसते. त्यामुळे ही दुचाकी खरेदी करणाऱ्याच्याही सर्वसामान्यत: हा बदल लक्षात येत नाही.
पोलिसांनाही प्रथमदर्शनी हे लक्षात आले नव्हते. हा प्रकार पोलिसांना लक्षात आल्यावर पोलिसही चक्रावले आहे. कारण यापूर्वी अशा प्रकारची शातीर पद्धती कधी पोलिसांपुढे आलीच नाही.
वास्तविकत: आरटीओमध्ये (एम. एच. २७ एव्ही ३६१९) या क्रमांकाच्या दुचाकीच्या आरसीवरील इंजिन क्रमांक चेसिस क्रमांक पूर्णत: वेगळा आहे. पोलिसांनी घाटलाडकीवरून जप्त केलेल्या दुचाकीच्या चेसिस इंजिन क्रमांकावरून माहिती घेतली असता ही दुचाकी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरातील असल्याचे उघड झाले असून, त्या दुचाकीचा खरा क्रमांक (एमपी ६८ एम ३४०९) आहे. यावरून चोरी करून बनावट पद्धतीने आरसी तयार करणारे हे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. घाटलाडकी येथील युवकाने ही दुचाकी ३१ हजार रुपयांत म्हणजेच बाजार मूल्यानुसारच खरेदी केलेली आहे. त्या युवकाने ही दुचाकी चांदूरबाजार तालुक्यातील एका व्यक्तीच्या मध्यस्थीने अमरावतीवरून खरेदी केली होती. विशेष म्हणजे अजूनही काही दुचाकी त्याच्याकडे त्या वेळी विक्रीसाठी असल्याचे पोलिसांना त्या युवकाने सांगितले आहे. त्यामुळे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बनावट आरसी तयार करणारा अमरावती शहरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, घाटलाडकीवरून पोलिसांनी दुचाकी जप्त केल्याचे समजल्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील तो दलाल पसार झालेला आहे, तर अमरावतीतील तो मुख्य सूत्रधार सध्या अमरावतीच्या मध्यवर्तीच्या कारागृहात आहे.
पोलिसांनी या प्रकरणात खोलवर तपास सुरू केला असून, लवकरच पोलिस या प्रकरणात स्वत: तक्रारदार होऊन गुन्हा दाखल करणार आहे कारागृहात असलेल्या त्या सूत्रधारास ताब्यात घेणार आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, त्यांनी आणखी किती दुचाकी विकल्या, हे सर्व त्या वेळी पुढे येणार आहे

दुचाकीचा खरा क्रमांक त्याच दुचाकीला
याटोळीने बनावट आरसी तयार करण्यापूर्वी खरा क्रमांक ज्या दुचाकीला असेल त्याच पद्धतीने चोरीच्या दुचाकीला तोच क्रमांक टाकायचा. (उदा: एखादी हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरली, त्या दुचाकीची बनावट आरसी तयार करायची आहे. त्यावर हे रॅकेट मात्र क्रमांक टाकताना त्याच रंगाच्या, त्याच प्रकारच्या दुसऱ्या कोणत्याही याचे कारण म्हणजे पोलिसांची दिशाभ्ूल करणे. कारण पोलिसांना संशय आल्यास प्रथमदर्शनी एका सॉफ्टवेअरद्वारे पोलिस दुचाकीचा क्रमांक त्या सॉफ्टवेअरला देतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये दुचाकीचा रंग दुचाकीचा क्रमांक यांचा निकाल दाखवतात. तो चोरीच्या दुचाकीलासुद्धा लागू होतो.

मुख्य सूत्रधारास यापूर्वी झाली अटक, चोरीच्या दुचाकी जप्तीच्या
या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला अमरावती शहरातील रहिवासी असून, तो सध्या तडीपार आहे. तडीपार असतानाही शहरात वास्तव्य केल्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला यापूर्वी शहर ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याच्या दोन सहकाऱ्यांनाही दुचाकी चोरीमध्येच अटक केली होती. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन ते चार दुचाकी जप्त केल्या होत्या. मात्र, त्या वेळी बनावट आरसीचे प्रकरण पुढे आले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आरसी तपासल्या नव्हत्या.