आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून हल्ला; दोघे गंभीर- अमरावती येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील शोभा नगर, पॅराडाईज कॉलनीत राहणाऱ्या दाेघांमध्ये वाद आहे. या वादाचा वचपा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री चाकूने हल्ला चढवला. या वेळी जखमी युवकाच्या भावाने शनिवारी दुपारी वचपा काढण्यासाठी हल्ला करणाऱ्याच्या भावावर हल्ला केला. यामध्ये गाडगनेनगर पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

नीलेश पनसिंग जाधव (रा. शोभानगर) याच्यावर शुक्रवारी रात्री पराडाईज कॉलनीमध्ये राहणाऱ्या राजा पटेल नामक व्यक्तीने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या नीलेश जाधववर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी २३ एप्रिलला दुपारी नीलेशचा भाऊ दिनेश त्याच्या मित्रांनी नीलेशला राजाने मारल्याचा वचपा काढण्यासाठी त्याचे घर गाठले. त्यावेळी राजा घरी नव्हता मात्र त्याचा भाऊ सरफराज हा घरी होता. त्यावेळी दिनेश त्याच्या मित्रांनी सरफराजला चाकूने मारून जखमी केले. या प्रकरणात दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.