आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगाव परिसरामध्ये वाळूचे १२ ट्रक जप्त, परवान्यापेक्षा जास्त वाळूची करीत होते वाहतूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चार दिवसांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यात टिप्परने चिरडल्यामुळे वडील मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वाळू वाहतुकीदरम्यान दोषी आढळणाऱ्या ट्रकचालक, मालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, सोमवारपासून तळेगाव दशासर पोलिसांनी औरंगाबाद ते नागपूर महामार्गावर असलेल्या देवगाव चाैफुली परिसरात कारवाई केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी १२ ट्रक पकडले असून, ते ‘डिटेन’ करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशामुळे संपूर्ण जिल्हाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, तळेगाव दशासर पोलिसांनी वर्धा नदीच्या घाटावरून वाळूची वाहतूक करणारे १२ ट्रक पकडले. त्या वेळी ट्रकमध्ये असलेल्या वाळूबाबत असलेली रॉयल्टी ही कमी ट्रकमध्ये वाळू जास्त, असा प्रकार प्रत्येक ट्रकमध्ये आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी हे ट्रक ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात लावले. तसेच या ट्रकवर कारवाई करण्याबाबत धामणगाव रेल्वे तहसीलदार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. या माहितीवरून तहसीलदारांनी रॉयल्टीपेक्षा अधिक वाळू असलेल्या ट्रकमालकाला आर्थिक दंड ठोठावला आहे. मात्र, या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तळेगाव पोलिसांकडे मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. ही कारवाई तळेगावचे ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या नेतृत्वात पीएसआय राठोड, अमोल हरमकर, राहुल तराळे, नितीन वानखडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, तिवसा येथे पोलिस महसूल प्रशासनाने सहा वाहन पकडले होते. त्या वाहनांमध्येसुद्धा रॉयल्टीपेक्षा अधिक वाळूची वाहतूक सुरू होती. या वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महसूल प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

माफियांवरगुन्हे दाखल करू : यातस्करीला आळा घालण्यासाठी वाळू माफियांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी मंगळवारी (दि. २१) दिला. गौतम यांनी आज तिवसा येथे भेट देऊन वाळू तस्करीबाबत आढावा घेतला.

त्यारेतीघाटाचा ठेका रद्द : मंगळवारीबोरगाव निस्ताने येथे लिलावधारकाने नियमभंग केल्यामुळे रेती घाटाचा ठेका रद्द करण्यात आला आहे. आणखी सहा रेती घाटांना अटी शर्थीचा भंग केल्याप्रकरणी नाेटीस बजावण्यात आली आहे.

महसूल आरटीओ विभागाला दिले पत्र
आम्ही२४तासांपासून देवगाव परिसरातील मार्गांवरून जाणाऱ्या वाळूच्या ट्रकची तपासणी करून १२ ट्रक डिटेन केले. या ट्रकमध्ये रॉयल्टीपेक्षा अधिक वाळू आढळून आली. त्यामुळे आम्ही पुढील कारवाईसाठी महसूल आरटीओ विभागाला पत्र दिले आहे. महसूल विभागाने या प्रकरणात आर्थिक दंड ठेाठावला आहे. नीलेश सुरडकर, ठाणेदार.
तळेगाव दशासर पोलिसांनी जप्त केलेले वाळूचे ट्रक.
बातम्या आणखी आहेत...