अमरावती- एटीएमवर रक्कम काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सहानुभूती दाखवून त्याच्याकडील कार्ड घ्यायचे, काही वेळाने त्याच कार्डद्वारे एटीएमवरून ऑनलाइन रक्कम काढून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीचा मागील काही दिवसांपासून शहर पोलिस शोध घेत आहे. पोलिसांना यामध्ये दिशा मिळाली असून, लवकरच ही टोळी पोलिसांच्या हातात येणार आहे.
मागील दोन महिन्यात शहरात एटीएमची हेराफेरी करून रक्कम हडपण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांमध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम हडपण्यात आलेली आहे. शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्यात शहर कोतवाली पोलिसात या प्रकरणांचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा एप्रिल महिन्यात तर उर्वरित चार गुन्हे जून महिन्यात घडले आहे. या टोळीमधील सदस्य एटीएमच्या परिसरात वावर ठेवतात, त्यांच्याकडेही एटीएम कार्ड असतात. या एटीएमवर रक्कम काढण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडून रक्कम निघाली नाही किंवा काही