आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिप्पट रक्कमेचे आमिष; दहा लाखांनी फसवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पाच वर्षांत रक्कम तिप्पट देण्याचे आमिष देवून एका सेवानिवृत्त व्यक्तीला १० लाख रुपयांनी गंडविल्याचा प्रकार नुकताच समोर आला. या प्रकरणी फसगत झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या सात जणांविरुद्ध सोमवारी (दि. ५) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शंकरलाल नानाजी कराळे (७२ रा. परतवाडा) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुष्पेंद्रसिंग बघेल, रणविजय प्रतापसिंग बघेल, महेंद्रसिंग बघेल, धीरेंद्रसिंग बिशेनप्रसाद, संदीप शंकर सक्सेना, सहेंद्रसिंग बघेल एक महिला अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकरलाल कराळे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.दरम्यान, २०१० मध्ये त्यांनी साईप्रकाश प्रॉपर्टीज, डेव्हलपमेंट अॅन्ड गृप ऑफ कंपनीमध्ये रक्कम गुंतवली होती. सदर कंपनीचे मुख्य कार्यालय नोएडा, उत्तरप्रदेशात असून, अमरावतीत शाखा कार्यालय अंबर प्लाझा, शेगाव नाका, येथे होते. कराळे यांना २०१० मध्ये कंपनीत कार्यरत व्यक्तींकडून सांगण्यात आले होते की, या ठिकाणी आपण मुदत ठेव (एफडी), आरडी किंवा इतर गुंतवणूक केल्यास पाच वर्षात तिप्पट रक्कम मिळे.त्यामुळे कराळे यांनी १४ एप्रिल २०१० ला या कंपनीच्या कार्यालयात वेगवेगळ्या पद्धतीने एकूण १० लाख हजार रुपये गंुतवले होते. दरम्यान त्यांना पाच वर्षांनतर १२ लाख २७ हजार २०० रुपये इतरही काही रक्कम मिळणार होती. मात्र सदर रक्कम वारंवार मागणी करूनही मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या सर्व संचालकांना रकमेची विचारणा केली. दरम्यान, कंपनीच्या मुख्य संचालकाला भोपाळ पोलिसांनी फसवण्ूक प्रकरणातच अटक केली आहे. अशी माहिती कराळे यांना मिळाली. दरम्यान ही रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही, त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच कराळे यांनी सोमवारी (दि.४)गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.या प्रकरणात अजूनही काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...