आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल व्यवस्थापकासह वेटरवर चाकू हल्ला, होटॅल आदित्यमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रहाटगावपरिसरातील होटॅल आदित्यमध्ये आलेल्या ते आठ जणांनी क्षुल्लक कारणावरून हॉटेलच्या व्यवस्थापकासह वेटरवर हल्ला चढवून साडेतीन हजारांची रोख पळवली तसेच काचांची प्रचंड तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी (दि. १) दोघांना अटक केली आहे.

सचिन सुरेश निंभोरकर (२८ रा. अर्जुननगर) असे तक्रारदार जखमी झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याच हल्ल्यात वेटर सतीश नितनवरे गंभीर जखमी झाले आहे. हल्लेखोरांनी सतीश यांच्या पोटात चाकू मारल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी रविवारी मध्यरात्री स्वप्नील ऊर्फ भाम्या केशवराव भामद्रे (२४, रा. मांजरखेड, ह. मु. छत्रसालनगर, अमरावती) याला तर गुन्हे शाखा पोलिसांनी प्रमोद नागोरावजी भघेवाल (२४, रा. न्यु हनुमान नगर, अमरावती) याला सोमवारी दुपारी अटक केली. अजूनही चार ते पाच जण पसार असल्याची माहिती आहे. स्वप्नील, प्रमोद यांच्यासह सात ते आठ जण रविवारी रात्री हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी यांना सिगारेट पिण्यासाठी हॉटेलच्या वेटर व्यवस्थापकाने विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या या सात ते आठ जणांचा वेटरसोबत वाद झाला. यावेळी वाद चिघळला यापैकी एकाने वेटर सतीशच्या पोटात चाकू मारला. त्यानंतर हाॅटेलमधील साहित्याची नासधूस करून दहशत पसरवून गल्ल्यातील तीन हजार रुपये घेऊन पळाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

दोघांना पकडले
हॉटेल आदीत्यमध्ये काहींनी वाद घालून वेटरसह व्यवस्थापला मारहाण केली तसेच चाकू हल्ला केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीवरून गुन्हे दाखल करून दोघांना पकडले आहे. उमेशपाटील, ठाणेदार, नांदगाव पेठ.
बातम्या आणखी आहेत...