आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूर येथे महिलेच्या गळ्यातून डोरले लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दर्यापूर येथील गजानन कॉलनीतील रहिवासी प्रमिला राऊत घरी जात असताना दोन अज्ञात नागरिकांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे बारा हजार रुपये किंमतीचे डोरले चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. ५) दुपारी घडली.

राऊत दुपारी चार वाजताच्या सुमारास गजानन कॉलनीतील गल्लीतून घरी जात होत्या. दरम्यान, भडांगे यांच्या घराजवळ दोन अज्ञान नागरिक आले त्यांनी राऊत यांच्या गळ्यातील डोरले पोत असा अंदाजे बारा हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. परिसरात या घटनेमुळ दहशत पसरली असून राऊत यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी दर्यापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...