आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकवीरा देवी संस्थानच्या रकमेचा सेवकाने केला लाखाेंचा अपहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील एकविरादेवी संस्थानच्या एका सेवकाकडे मागील काही वर्षांपासून एकविरा देवी मंगलकार्यालयाचा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी होती. या सेवकाने मंगल कार्यालयाचे बनावट पावती पुस्तक छापून तीन वर्षांपासून तब्बल लाख ९५ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार संस्थानच्या सहसचिवांनी राजापेठ पोलिसांत दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी या सेवकाविरुद्ध रविवारी (दि. ३) फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. अजय सावरकर (रा. कुंभारवाडा) असे गुन्हा दाखल केलेल्या सेवकाचे नाव आहे. या प्रकरणात एकविरा देवी संस्थानचे सहसचिव शैलेश मनोहरराव वानखडे (४५) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. अजय सावरकर हे एकविरा देवीचे सेवक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने त्यांच्याकडे संस्थानच्या मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाची जबाबदारी देण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेत सावरकरने बनावट पावती पुस्तक छापून घेतले होते. सावरकरने ऑक्टांेबर २०१२ ते २६ ऑगस्ट २०१५ या कार्यकाळात सहा लाखांचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर एक ते सव्वा लाख रुपयांचा त्यांनी संस्थानकडे भरणा केला होता. मात्र तरीही लाख ९५ हजार रुपयांची रक्कम संस्थान मिळाली नाही.त्यामुळे वानखडेंनी पोलिसांत तक्रार दिली .

गुन्हा दाखल, प्रकरणाचा तपास सुरू
संस्थानच्या सहसचिवांनीदिलेल्या तक्रारीवरून मंगलकार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून काम सांभाळणाऱ्या अजय सावरकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिशिरमानकर, प्रभारी ठाणेदार, राजापेठ.
बातम्या आणखी आहेत...