आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकमधून २३ जनावरांची सुटका, एकास केली अटक, दोन आराेपी झाले पसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगरुळ चव्हाळा- मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून एका ट्रकमध्ये कोंबलेल्या २३ जनावरांची सुटका केली. यावेळी मुजोदिद्दीन सिराजुद्दीन (२३, रा. मूर्तिजापूर ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही कारवाई नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर मंगरुळ चव्हाळा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.

नागपूर येथून औरंगाबाद राज्य महामार्गाने जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक (एमएच ०४/ डीके ७९१२) ची तपासणी केली असता २३ जनावरे निर्दयतेने काेंबल्याचे आढळून आले. ही जनावरे विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जनावरांची सुटका करून येथील श्री रामदेवबाबा गोशाळेत रवानगी केली. ही कारवाई एपीआय अभिजित अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत यावल, संतोष गहेरवाल, हरिहर वैद्य यांनी केली.

पाचमहिन्यांतील दुसरी कारवाई : जनावरेपकडण्याची पाच महिन्यातील ही दुसरी कारवाई असून या पूर्वीची कारवाई मार्च महिन्यात करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान लाख ६० हजार रुपये किंमतीच्या १६ म्हशी जप्त करण्यात आल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...