आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात एकाच दिवसात पडले पाच जणांचे खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अवैध दारू विकण्याच्या वादातून झालेल्या तिहेरी खुनाला १२ तास उलटत नाहीत, ताेच मंगळवारी रात्रीच दारू अाणि जुगाराच्या पैशाच्या वादातून उपराजधानी नागपुरात अाणखी दाेघांचे खून पडले. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगर परिसरात रवी प्रकाश डुले (वय २६) व बंटी ऊर्फ संदीप शरद आटे (वय २९) या दाेघांचे मृतदेह सापडले. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात अाली. याप्रकरणी पोलिसांनी मनोज भारद्वाज (वय २५) याला अटक केली आहे.

रवी आॅटोरिक्षा चालवतो, तर आरोपी मनोज आणि बंटी हे सेंट्रिंगचे काम करतात. काही दिवसांपूर्वी रवीने त्याच्या नातेवाइकाची गाडी मनोजला वापरण्यास दिली हाेती. मनोजने ही दुचाकी दुसऱ्याकडे तारण म्हणून ठेवली. याबाबत माहिती कळताच रवीने मनोजकडे दुचाकी परत करण्याचा तगादा लावला. यातून त्यांच्यात वाद हाेत असत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास रवी, बंटी, मनोज आणि इतर पाच ते सहा मित्र इंद्रप्रस्थनगरातील बाजाराच्या ठिकाणी दारू पीत व जुगार खेळत बसले हाेते. उशिरापर्यंत रवी, बंटी व मनोज मात्र तिथेच थांबले होते. तिघांनाही पुन्हा दारू प्यायची होती. मात्र, दारू कोण आणणार यावरून रवी व मनोजमध्ये वाद सुरू झाला. या वादातून दुचाकीचाही मुद्दा निघाला. तेव्हा मनाेजने तातडीने रवीची दुचाकी त्याला अाणून दिली, परंतु त्यानंतरही वाद सुरू हाेता. नशेतील मनोजने सिमेंटचे पत्रे रवीच्या डोक्यावर मारले. यात रवी रक्तबंबाळ झाला, तर बंटीने आरडाओरडा केला. त्यामुळे मनोजने बंटीच्या डोक्यातही दगड घातला. त्यात दोघेही ठार झाले. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरात अवैैध दारू विक्रीच्या वादातून सुनील कोटांगळे, गोलू उर्फ आशिष गायकवाड व कैलाश बहादुरे यांचे खून झाले हाेते.