आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन् धावत्या आॅटोतून युवतीने टाकली उडी, एकटीला पाहून चालकाने टाकली होती वाईट नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अचलपूर येथे राहणारी एक १७ वर्षीय युवती बुधवारी (दि. १७) रात्री १० वाजताच्या सुमारास परतवाडा येथून अचलपूरला जाण्यासाठी एका ऑटोमध्ये बसली. मात्र काही अंतर गेल्यानंतर ऑटो चालकाने या युवतीवर वाईट नजर टाकून ऑटोची दिशा बदलवली. ऑटो चालकाचे वर्तन संशयास्पद वाटल्याने या युवतीने जीवाची पर्वा करता धावत्या ऑटोतून उडी टाकून थेट पोलिस ठाणे गाठले. त्या ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे.

परतवाडा येथील एका गारमेंट्समध्ये काम करणारी १७ वर्षीय युवती दिवसभराचे काम आटोपून रात्री १० वाजताच्या सुमारास परतवाडा येथील जयस्तंभ चौकात ऑटोची प्रतीक्षा करत होती. त्याच दरम्यान एक ऑटो आला, त्यामध्ये पुर्वीच दोन प्रवासी बसले होते. या ऑटो चालकाने त्या दोन प्रवाशांना बसस्थानकावर उतरवून दिले. त्यामुळे ही युवती ऑटोचालक दोघेच ऑटोमध्ये होते.

अचलपूरला जाण्यासाठी त्याने शहरातील मार्ग सोडून दिला. अमरावती मार्गावरील विदर्भ मिलपासून जाणाऱ्या मार्गाच्या दिशेने ऑटो जात होता. त्यावेळी युवतीने ऑटो चालकाला हटकले सरळ मार्गाने चल, असे म्हटले असता त्याने उलट उत्तर देवून चल आपण फिरून येऊ, असे सांगितले. ऑटो चालकाच्या या वाकड्या उत्तराने युवती घाबरली, तिने ऑटो थांबविण्यास त्याला सांगितले मात्र त्याने ऑटो थांबविण्याऐवजी आणखी जोरात पळवण्यास सुरूवात केली. त्यावेळी मात्र या युवतीने जीवाची पर्वा करता थेट धावत्या ऑटोतून खाली उडी मारली. त्यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी त्या युवतीच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे ऑटो चालक ऑटोसह पसार झाला.

सदर प्रकरणी युवतीने परतवाडा पोलिस ठाणे गाठून ऑटो चालकाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग, अपहरण बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलमान्ये गुन्हा दाखल केला आहे. युवतीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी त्या ऑटोचालकाचा शोध सुरू केला आहे.

लवकरच अटक करू
युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. त्या ऑटो चालकाचा कसून शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यात येणार आहे. किरणवानखडे, ठाणेदार, परतवाडा.

हाता- पायांना झाली दुखापत
युवतीने पुढील अनर्थ टाळण्यासाठी जीवाची पर्वा करता धावत्या ऑटोमधून उडी घेतली. त्यामुळे तिच्या दोन्ही हाय पायांना दुखापत झालेली आहे.
बातम्या आणखी आहेत...