आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक, कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- केलेल्या कामाच्या मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी ३२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावच्या सरपंचासह तेथील ग्रामविकास अधिकारी याला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ढाणकी येथे सरपंचाच्या घरी केली.

शिवराम नारायण फाळके वय ३४ वर्षे, सरपंच ढाणकी ग्रामपंचायत, ता. उमरखेड आणि किशोर सुदाम पुंडे वय ५४ वर्षे ग्रामविकास अधिकारी ढाणकी, पंचायत समिती उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. या प्रकरणी सविस्तर असे की, तक्रारदार कंत्राटदार यांनी ढाणकी ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्याचे सुमारे एक लाख ५१ हजार रुपये किमतीचे काम केले. या केलेल्या कामाची देयके तातडीने काढून देण्यासाठी दोन्ही आरोपींना संगनमत करुन तक्रारदार याच्याकडे ३२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावरुन तक्रारदार यांनी यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागात भेट देऊन या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी ढाणकी गावात सापळा रचला. त्यात ढाणकी गावात वार्ड क्रमांक एक मध्ये राहणाऱ्या सरपंच शिवराम फाळके याच्या घरी दोन्ही आरोपींना तक्रारदार याला त्याच्या कामाचा मोबदला असलेल्या एक लाख ५१ ५१ हजार रुपयांच्या देयकातून ३२ हजार रुपये कापून घेऊन उर्वरीत रक्कम अदा केली. यावेळी त्या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारुन दोन्ही आरोपींना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यानंतर त्या दोघांना घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक यवतमाळकडे रवाणा झाले. या ठिकाणी रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अस्मिता नगराळे, कर्मचारी अरुण गिरी, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, निलेश पखाले, अनील राजकुमार, भारत चिरडे, नरेंद्र इंगोले, प्रकाश शेंडे, धलवार यांनी पार पाडली.
बातम्या आणखी आहेत...