आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला डॉक्टरची छेड काढणाऱ्यास चोप, आरोपीही डॉक्टरचं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची छेड काढणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरला १० ते १५ महिला डॉक्टरांनी मिळून चांगलाच चोप दिला. ही घटना येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात दि. जून रोजी दुपारी घडली. या घटनेने रुग्णलय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

येथील वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात कार्यरत असलेल्या एका विभागातील डॉक्टरने गायनिक विभागातील परिवेक्षाधीन महिला डॉक्टरची छेड काढली. ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती परिवेक्षाधीन महिला डॉक्टरने तिच्या सहकारी डॉक्टरांना दिली. त्यानंतर संतप्त १० ते १५ डॉक्टरांनी त्या डॉक्टरला चांगलाच चोप दिला. यावेळी रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती तर रुग्णालयातील रुग्णांनी या ठिकाणी चांगलीच गर्दी केली होती. याबाबतची तक्रार महिला डॉक्टर वैद्यकीय अधिष्ठाता राठोड यांच्याकडे करणार असल्याची चर्चा सुरू होती. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कुठलिही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. तर अधिष्ठाता यांच्याकडेही तक्रार दाखल केल्याची मािहती नव्हती.

रुग्णालयातविविध समस्या : वसंतरावनाईक जिल्हा रुग्णालयात विविध समस्या आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना या जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचरद्वारे रुग्ण घेऊन जावे लागते. कुठलेही कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांनी मदत करत नाही. याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता राठोड यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र, कुठलाही बदल अद्यापही जिल्हा रुग्णालयात दिसून आलेला नाही. नुकताच या रुग्णालयासाठी शासनाच्या वतीने माेठा निधी देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

डॉक्टरला चोपल्याची पहिलीच घटना
जिल्हा रुग्णालय डॉक्टरांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चेत आहे. या रुग्णालयातील महिला डॉक्टरांसोबत रुग्णांच्या नातेवाईकांचे वाद नेहमी होत असतात. त्यामुळे डॉक्टरांनी सामान्य नागरिकांविरुद्ध याआधी अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात केल्या आहे. मात्र, रुग्णालयातील एका विभागातील वरिष्ठ डॉक्टरलाच परिवेक्षाधीन महिला डॉक्टरची छेड काढल्याप्रकरणी चोप देण्यात आल्याची घटना प्रथमच घडल्याने या घटनेची रुग्णालय परिसरामध्ये रुग्णातही चर्चा सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...