आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळात पालखीवर दगडफेक, वर्धा येथून पंढरपूरकडे जात होती पालखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- वर्धायेथून पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराज यांच्या पालखीवर नागपूर बायपासवर अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये चार ते पाच वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. ते शहरातील लोहारा येथे मुक्कामी येत असताना घडलेल्या या घटनेमुळे शहरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

वर्धा येथून निघालेली ही पालखी रात्री ८ वाजता शहरात दाखल होताच बायपासवर दगडफेक करण्यात आली. घटनेनंतर आरोपी पळून गेले. या पालखीत ६० पुरुष, २० महिला दोन वाहने असा लवाजमा होता. घटना घडल्यानंतर वारकऱ्यांनी थेट शहर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दाखल केली. तर घटनेची माहिती शहरात होताच तणाव निर्माण झाला होता. शहर पोलिस स्टेशनमध्ये आमदार मदन येरावार, भाजप जिल्हाध्यक्ष राजू डांगे यांच्यासह शेकडोचा जमाव जमला त्यांनी आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी लावून धरली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक डोळे यांनी आरोपीविरुद्ध कारवाई करून दिंडीला जिल्ह्याबाहेर जाईपर्यंंत संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ही दिंडी लोहारा येथे मुक्कासासाठी पोलिस बंदोबस्तात निघून गेली. दुसरीकडे या घटनेनंतर आर्णी मार्गावर माई हॉटेलसमोर अज्ञात युवकांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला होता.
बातम्या आणखी आहेत...