आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींशी अश्लील चाळे, शिक्षकांवर गुन्हे, यवतमाळमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी लैंगिक चाळे करणाऱ्या यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दाेन शिक्षकांवर पाेलिसांनी गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले अाहे. हा प्रकार समजताच संतप्त पालकांसह शेकडोंचा जमाव शाळेवर धडकला, त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला हाेता. दरम्यान, आरोपींवर कारवाईसाठी गुरुवारी बंदची हाक देण्यात अाली अाहे.

गेल्या काही वर्षांपासून या शाळेत काही शिक्षक मुलींसोबत लैंगिक चाळे करत असल्याची तक्रार होती. पहिलीतील काही मुलींनी याबाबत तक्रार केल्यानंतर पालकांनी पाेलिसांत फिर्याद दाखल केली. यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर अशी अाराेपी शिक्षकांची नावे अाहेत. संतप्त पालकांनी शाळेत येऊन जाब विचारला. भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले हाेते. जमावाने त्या शिक्षकांना चोप देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाेलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेऊन पाेलिस ठाण्यात अाणले. तिथेही जमाव चालून अाला. दरम्यान, दोन्ही शिक्षकांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत नेत असताना काही महिलांनी तिथे अाराेपींना चाेप दिला.

सहकार्य करणार
चुकीच्या माणसांना किंवा गोष्टीला शाळा प्रशासनाचा नेहमी विरोधच अाहे.. पोलिसांनी कारवाई पूर्ण करावी. त्यासाठी सर्व सहकार्य शाळा प्रशासन करेल. बुधवारी शाळेत आलेल्या सर्व पालकांना प्रशासनाने सहकार्यच केले. शेवटी चुकीच्या गोष्टीला आमचाही विरोधच राहणार आहे. किशोरदर्डा, सचिव, श्री जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी, यवतमाळ.
बातम्या आणखी आहेत...