आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा गोळीबाराचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीनेही हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी भेट देऊन पाहणी करताना पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह. - Divya Marathi
घटनास्थळी भेट देऊन पाहणी करताना पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह.
यवतमाळ- गेल्याकाही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा वचपा काढण्यासाठी एका तरुणावर घरात शिरून गोळीबार करण्यात आला. त्यासोबतच त्याच्यावर तलवारीचेही वार करण्यात आले. ही खळबळजनक घटना बुधवारी येथील चमेडियानगर परिसरात भरदिवसा दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यातील जखमी युवकाला दोन गोळ्या लागल्या असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजकुमार रूपलाल प्रजापती (वय २५ वर्षे, रा. चमेडियानगर), असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार याचा गेल्या काही दिवसांपूर्वी काही युवकांसोबत वाद झाला होता. या घटनेचा वचपा काढण्यासाठी ते तरुण दुपारी साडेतीनच्या सुमारास राजकुमारच्या घरात शिरले. त्या ठिकाणी त्यांनी अचानक राजकुमारवर हल्ला चढवला. ही बाब लक्षात येताच राजकुमारने घरातून पळ काढला. या वेळी हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या राजकुमारच्या पाठीत लागल्या. त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने वार केले. गोळ्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ही बाब लक्षात येताच हल्लेखोर पसार झाले. या वेळी परिसरातील नागरिकांनी राजकुमार याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी राजकुमारच्या घराच्या परिसरात एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यासोबतच त्याच्या परिवारातील सदस्यांचे बयाण घेण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, उपचार घेत असलेला हल्यात जखमी झालेला राजकुमार प्रजापती
बातम्या आणखी आहेत...