अमरावती - सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्जदारांच्या याद््या वेळेत सादर केल्यामुळे कर्जदारांना शासकिय सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत सराफा व्यवसायिक महादेव नामदेवराव कुबडे यांच्याविरुद्ध गुरूवारी रात्री सावकारी अधिनियम, विश्वासघात अन्य कलमान्वये कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापूर्वीही कुबडेकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी कर्जमाफीच्या लाभासाठी सहायक उपनिबंधक यांच्याकडे सावकाराचे उंबरठे झिजवले होते, हे विशेष.
दरम्यान काही सराफा व्यावसायिक नियमबाह्य व्याज आकारून दागिने गहाण ठेवत असत, पावतीवर शासकीय दर नमुद केला जात असे, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असे. योजनेच्या घोषणेनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल होते. याअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. काही सराफा व्यावसायिकांनी कर्जदारांच्या याद्या उपनिबंधक कार्यालयात सादर केल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहीले.
वंचित शेतकऱ्यांनी सावकारी कर्जमाफीच्या लाभासाठी उपनिबंधक कार्यालयात चकरा मारल्या. दरम्यान याद्याच सादर झाल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून ही शेतकऱ्यांचे समाधान होईल असे उत्तरे देता आले नव्हते. शहरातील महादेव नामदेवराव कुबडे हे सराफा व्यवसायिक असून, ते परवानाधारक सावकार आहे. दागिने तारण ठेवून त्यावर कर्ज देण्याचा व्यवसाय त्यांचा आहे. शासनाने सावकारी कर्जमाफी योजना सुरू केली. या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्तीचा शासनाचा निर्णय होता.
त्यामुळेच उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सावकार महादेव कुबडेंना ३० नोव्हेंबर २०१४ च्या स्थितीवर थकीत कर्जदारांच्या नावांची विहित नमुन्यात याद्या मागितल्या होत्या. त्या याद््या मिळाव्यात यासाठी उपनिबंधकांनी कुबडे यांना पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या. परंतू कुबडेंनी या पत्राकडे दुर्लक्ष करून या याद्या सादर करण्यास हलगर्जीपणा केला. उपनिबंधक कार्यालयातून या याद्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. त्यामुळे पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर कुबडेंनी काही कर्जदारांच्या याद्या उशिरा म्हणजेच योजनेची मुदत संपत आली असताना सादर केल्या. तर ६२० कर्जदारांची यादी योजनेची मुदत संपल्यावर ३१ मार्च २०१६ नंतर सादर केली होती. सावकार कुबडेच्या या प्रतापामुळे पात्र कर्जदार सावकारी योजनेपासून वंचित राहीलेे. कुबडेने यादी देण्यास विलंब केला त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, ते शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकले नाही. त्यामुळे महादेव कुबडेंना जबाबदार धरून गुरूवारी १२ जानेवारीला सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेश पालेकर यांनी कोतवाली पोलिसात तक्रार दिली. तक्रारीसह कुबडेच्या या प्रकरणाचे पुरावे पोलिसांकडे सादर केले. त्यामुळे पोलिसांनी महादेव कुबडे विरुद्ध विश्वासघात, ठकबाजी, नुकसान पोहचवणे, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४३ प्रमाणे गुन्हा नोंदवला.
महादेव कुबडेचा सुरू आहे शोध
उपनिबंधकाच्या तक्रारीवरून त्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे आम्ही महादेव कुबडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच शोध घेतला मात्र ते फरार झाले आहे. आम्ही त्यांचा शोध सुरू केला आहे.’’ - विजयपाटकर, ठाणेदार, शहर कोतवाली.
कर्जमाफी योजनेनेे शेतकऱ्यांचा फायदा
गत वर्षी हिवाळी अधिवेशनात कर्जदारांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सावकारी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. शेतकरी सराफा व्यावसायिकांकडे दागिने गहाण ठेवून पैशाची उचल करतात. या सावकारी कर्जमाफी योजनेनेे शेतकऱ्यांचा फायदा झाला.