आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या हातातून आरोपी पळाला, परतवाड्यातील तीन महिन्यांमधील दुसरी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- पोलिसकोठडी मिळालेल्या आरोपीला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला नेले असता, तैनात पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पळून गेला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

रवींद्र रामटेके (रा. ब्राम्हणवाडा पाठक )असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून, एका युवतीला विकण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडी सुनावली होती. विशेष म्हणजे पोलिसांदेखत आरोपी पळून जाण्याची मागील तीन महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील बस स्थानकावर एका युवतीला विकण्याच्या प्रयत्नात असताना दोन महिलांसह रवींद्रला ताब्यात घेण्यात आले होते. रवींद्रला न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्याला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणीकरिता नेत असता पोलिसांना गुंगारा देत त्याने रुग्णालयातून पळ काढला. अशाच प्रकारची घटना दोन महिण्यापूर्वी परतवाडा पोलिस स्टेशनमध्ये घडली होती. तेव्हा खरपी येथील शे. फरहान असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव होते. या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर येत आहे.

फरार आरोपीचा कसून शोध सुरू
परतवाडा बसस्थानकावर दोन महिलांसह रवींद्र रामटेके याला ताब्यात घेण्यात आले होते. पोलिस कोठडी असल्याने नियमित आरोग्य तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयातून त्याने पळ काढला. त्याच्या शोधासाठी पोलिस पथक नेमले असून, त्याचा कसून शोध सुरू आहे. किरण वानखडे, ठाणेदार,अचलपूर.
बातम्या आणखी आहेत...