आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शहरातील संकटमोचन परिसरात अमीत पाटणकर या २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना दि. १० ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून या खून प्रकरणातील दोन आरोपींना दुसऱ्याच दिवशी वडगावरोड पोलिसांनी अटक केली होती. तर उर्वरीत दोन मुख्य सूत्रधार घटनेच्या दिवसापासून फरार होते त्यांना वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून टोळी विरोधी पथकाने दि. २४ रोजी ताब्यात घेतले. नाना रोडे आणि मयूर पुसनाके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

संकटमोचन परिसरातील अमित पलटणकर याचा जुन्या वादाच्या कारणावरून दि. १० ऑगस्ट रोजी नाना रोडे, संजय शिंदे, जांग्या बाचलकर चिनी पुसनाके या चौघांनी खून केला होता. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेल्या अाशिष पलटणकरला देखील मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आशिष पलटणकर याने वडगावरोड पोलिस ठाण्यात जांग्या उर्फ संजय बाचलकर, बारक्या उर्फ संजय शिंदे, नाना रोडे चिनी उर्फ मयूर पुसनाके सर्व रा. संकटमोचन परिसर यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता वडगावरोड पोलिसांनी चौघांविरूध्द खूनाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून शोध सुरू केला. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दोन आरोपी जांग्या उर्फ संजय बाचलकर आणि बारक्या उर्फ संजय शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केली. परंतू मुख्यसुत्रधार नाना रोडे आणि मयुर पुसनाके हे दोघेही तब्बल तेरा दिवसांपासून फरार होते. सदर आरोपी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे असल्याची गोपनीय माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने या दोघांना सेवाग्राम येथून दि. २४ रोजी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई टोळी विरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत गिते यांच्यासह पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली. शुक्रवार, त्यांना कोर्टात दाखल करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...