आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून वडिलांचा केला खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वडाळीतील प्रबुध्दनगरमध्ये एका २७ वर्षीय मुलाने वडिलांना क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून जीवानिशी ठार मारले. ही घटना मंगळवारी दि. (२०) दुपारी घडली आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे.

महादेव आनंदराव उघडे (५५) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. तर विनोद महादेवराव उघडे (२७, रा. प्रबुध्दनगर, वडाळी) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

महादेव उघडे त्यांचा मुलगा विनोद यांच्यात मंगळवारी दुपारी क्षुल्लक वाद झाला. यावेळी दोघेही बापलेक मद्याच्या सेवनात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाब्दिक बाचाबाचीवरून दोघेही एकमेकांना मारहाण करायला लागले. पती मुलगा मारामारी करत असल्यामुळे विनोदची बाई बेबीबाई वाद सोडविण्यासाठी मधात गेली मात्र विनोदने तीलाही ढकलून दिले. यावेळी हे दोघे मारामारी करत स्वयंपाक खोलीत आले. स्वयंपाक खोलीत असलेला दगडी वरवंटा पाटा विनोदने त्याच्या वडीलाच्या डोक्यात मारला. या मारहाणीत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांना माहीती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत महादेव उघडे यांचे प्राण गेले होते. पोलिस पोहचले त्यावेळी महादेव उघडे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून विनोदचा शोध घेतला असता तो पळण्याच्या तयारीत होता. त्याला पोलिसांनी अटक केली. यावेळी एसीपी महेश जोशी, फ्रेजरपुराचे ठाणेदार गुलाबसिंग सोळंके हे सुध्दा घटनास्थळी पोहचले होते. विनोदला प्रकाश धुर्वे, जावेद अहमद, विजय बहाद्दुरे, ओमप्रकाश देशमुख, गौतम धुंरदंर, प्रविण म्हाला यांनी अटक करून ठाण्यात आणले होते.
या प्रकरणी बेबी महादेवराव उघडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहीती प्रभारी ठाणेदार सोळंके यांनी दिली आहे.
महादेवरावओकले म्हणून विनोदने मारले
विनोदबाहेरून घरी आला, त्यावेळी त्याने जेवणासाठी आईला ताट वाढून मागितले. तो जेवण करायला बसला. त्यावेळी त्याचे वडील महादेवराव घरातच झोपले होते.
त्याच दरम्यान त्यांनी ओकारी केली. मी जेवायला बसलो आहे,आणि तुम्ही ओकारी करता, असे म्हणून विनोदने वडीलांना शिव्या दिल्या, त्यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर विनोदने त्याच्या वडीलांना दगड मारून जीवानिशी ठार मारले, असे या धक्कादायक प्रकारानंतर विनोदची आई बेबीबाई रडत रडत सांगत होती