Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» CRPF Jawan Commits Suicide

CRPF जवानाने स्वतःच्याच छातीत झाडल्या गोळ्या; भामरागड तालुक्यात केली आत्महत्या

प्रतिनिधी | Jul 17, 2017, 15:38 PM IST

  • CRPF जवानाने स्वतःच्याच  छातीत झाडल्या गोळ्या; भामरागड तालुक्यात केली आत्महत्या
गडचिरोली - केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस ठाण्याच्या आवारातल्या बॅरेकमध्ये ही घटना घडली. व्ही. हनुमंत असे मृत जवानाचे नाव आहे. तो सीआरपीएफच्या 9 क्रमांकाच्या बटालियनमध्ये कार्यरत होता.

व्ही.हनुमंत याने दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून आपल्या छातीवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत सविस्तर चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Next Article

Recommended