आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचे नियंत्रण सुटून क्रूझर उलटली; नांदेडचे 3 जण ठार; भाविकांवर काळाचा घाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहनावरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्‍याने 3 जण जागीच ठार झाले आहेत. - Divya Marathi
वाहनावरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्‍याने 3 जण जागीच ठार झाले आहेत.
मेहकर (जि. बुलडाणा) - देवदर्शन करून परत जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील (रेल्वे उमरी) येथील  भाविकांची क्रूझर गाडी उलटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे गुरुवारी घडली. दरम्यान, या अपघातात सुदैवाने चार महिन्यांचा चिमुरडा बचावला असून त्याच्या आईचा मृत्यू  झाला आहे.
 
अर्चना कदम (३६) श्रुती गव्हाणे (१०) आणि दशरथ हनुमंत गव्हाणे (७०) अशी मृतांची नावे आहेत,  तर अद्वैत कदम (६), किसन गव्हाणे (१४) अदिती गव्हाणे (११) विनीत कदम (२०)आणि मीराबाई काळे (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत.  नांदेड जिल्ह्यातील उमरी रेल्वे येथील भाविक क्रूझर गाडीने जाळीचा देव येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते गुरुवारी सकाळी परत आपल्या गावी उमरी रेल्वेकडे निघाले होते. मात्र, हिवरा आश्रमाजवळ अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात तिघांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ग्रामस्थांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढून जखमींना रुग्णालयात नेले.
 
 ४ महिन्यांचा चिमुरडा बचावला  
अपघातग्रस्त वाहनातून एक चार महिन्यांचा मुलगा आपल्या आईच्या कुशीत राहून प्रवास करत होता.  मात्र, सुदैवाने या अपघातातून तो सुखरूप बचावला. मात्र, त्याची आई अर्चना यांचा मृत्यू झाला आहे.
 
पुढील स्‍लाईडवर पहा, सुदैवाने बचावलेला चार महिन्याचा बालक...
बातम्या आणखी आहेत...