आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सायबर लॅब' होणार सुरू, अाधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अलिकडच्याकाळात माहिती तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आहे. त्यामुळेच ऑनलाईन बँकींग, मोबाईल, वेगवेगळे सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र त्याचप्रमाणे या सर्व तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर क्राईम करणाऱ्यांची संख्या सुध्दा वाढली आहे.
सायबर क्राईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाेेलिसांच्या सायबर विंग यापूर्वीच कार्यान्वित आहे मात्र सायबर क्राईम रोखण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस घटकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे सुसज्ज अशा सायबर लॅब सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सोमवारपासून (दि. १५) या लॅब कार्यान्वित होणार आहे. या लॅबमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिस सायबर क्राईम करणाऱ्यांच्या लवकरच मुसक्या आवळू शकणार आहे. अमरावतीमध्ये पोलिस आयुक्तालय ग्रामीण पोलिस दलात सायबर लॅबचे काम सोमवारपासून सुरू होणार आहे. संपुर्ण राज्यात एकाचवेळी ४४ ठिकाणी या लॅब सुरू होणार आहे. शासनाच्या 'डिजिटल इंडिया' प्रकल्पातून या लॅबचा जन्म झालेला आहे. दिवसेंदिवस वाढलेल्या सायबर क्राईमला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांसाठी ही लॅब महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी प्रत्येकच पोलिस घटकामध्ये सायबर विंग कार्यरत होती, मात्र सायबर गुन्हे करणाऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आवश्यक सामग्री आधुनिक तंत्रज्ञान पोलिसांकडे नव्हते. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या अावळणे किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस लॅबमध्ये बसून संशयित सायबर क्राईम करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवून त्याच्याकडून करण्यात येणाऱ्या हालचाली टिपू शकतील. पुर्वी मात्र पोलिसांना एखाद्या गुन्ह्यात आरोपींनी वापर केलेल्या संगणकातील हार्डडिस्कमधील डाटा तपासासाठी पाहीजे असल्यास आवश्यक ती प्रक्रीया करून संबधित जप्त केलेली हार्डडिस्क नागपुरात असलेल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात यायची. संपुर्ण विदर्भातील हार्डडिस्क किंवा अन्य बाबींच्या तपासात फॉरेन्सिक लॅबचीच मदत घ्यावी लागत असल्यामुळे पाठवलेल्या हार्डडीस्कचा अहवाल येण्यासाठी किमान ते आठ महिन्यांचा अवधी लागायचा आता मात्र त्या सर्व सुविधा स्थानिक स्तरावर असलेल्या सायबर लॅबमध्ये उपलब्ध झाल्या आहे.

यासुविधा मिळतील सायबर लॅबमध्ये
हार्डडिस्कमॅनेजमेंट : जप्त केलेल्या हार्डडीस्कची याच ठिकाणी तपासणी करून अहवाल तातडीने मिळेल, त्यामुळे कमी वेळात पोलिसांना सायबर क्राईम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येणार आहे.

डिव्हाईसफॉरेन्सिक :
मोबाईलचेगुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहे. डिव्हाईस फॉरेन्सिकमुळे पोलिसांना मोबाईलचे गुन्हे उघड करण्यात मोठी मदत होणार आहे.

नेटवर्कअॅनालिसीस सॉफ्टवेअर :
यासॉफ्टवेअरव्दारे पोलिसांना संशय असलेल्या सायबर गुन्हेगारावर सातत्याने नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे तो गुन्हेगार नेमका कशा पध्दतीने सायबर क्राईम करण्याचा प्रयत्न करतो आहे, ही बाब पोलिसांना लॅब मधूनच हेरता येणार आहे.

सीडीआर अॅनालीसिस सॉफ्टवेअर :
एखादा गुन्ह्यात आरोपींनी केलेल्या मोबाईल कॉलचे पोलिसांकडून डिटेल्स मागविण्यात येतात. यापुर्वी या डिटेल्स आल्यानंतर पोलिसांना 'मॅन्युअली' पध्दतीने त्यावर काम करावे लागायचे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ खर्ची व्हायचा मात्र या सॉफ्टवेअरमुळे पोलिसांना काम सोपे आणि कमी वेळात होणार आहे.

सोशलमिडीया लॅब :
अनेकदासोशल मिडीयावर नको असलेल्या पोस्ट किंवा 'क्रिएशन' केलेले छायाचित्र किंवा चित्रफीत व्हायरल केल्या जातात. मात्र हे नेमके कोणी केले, हा शोध घेण्यासाठी पोलिसांना खुप जास्त मेहनत घ्यावी लागायची तसेच अवधी सुध्दा लागायचा आता मात्र तो शोध पोलिसांना तातडीने घेता येणार आहे. या सर्व सुविधा सायबर लॅबमध्ये मिळणार असल्याचे आयुक्तालयाच्या सायबर पथकाचे प्रमुख एपीआय कांचन पांडे यांनी सांगितले.

लॅबमुळे मदत होणार
^सायबरक्राईमघडल्यानंतर तो गुन्हा तातडीने उघड करण्यासाठी तसेच सायबर क्राईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही लॅब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून लॅबचे काम सुरू होते. ते आता पुर्ण झाले आहे.कांचन पांडे, सायबर सेल प्रमुख.

'सायबर'सोबत इतरही गुन्हे उघड करण्यास मदत
^सायबर लॅबचेकाम पुर्ण झाले असून सोमवारी उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक अशी यंत्रणा असल्यामुळे सायबर क्राईमसोबतच इतर गुन्हे उघड करण्यास मदत होणार आहे. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त.

६५० वर्ग फूट क्षेत्रात लॅब
पोलिस आयुक्तालयात तळमजल्यावर ६५० वर्ग फुट क्षेत्रफळात ही लॅब तयार करण्यात आली असून लॅबमध्ये संगणक, दोन लॅपटॉप आहेत. तसेच लॅब ही वातानुकुलित असून सायबर लॅबमध्ये काम करणारे जवळपास १२ ते १५ कर्मचारी काम करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...