आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल यात्रेला मुख्यमंत्री दाखवणार हिरवी झेंडी, मिशन आॅलिम्पिक्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सायकलच्या प्रचारासाठी गत दोन दशकांपासून अग्रेसर शहरातील मिशन आॅलिम्पिक, लाईफ सायकल या संस्थेतर्फे नागपूर-अमरावती-पुणे-मुंबई सायकल यात्रेला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून नागपुरातील झिरो माईल्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. १५ ते २५ डिसेंबर या ११ दिवसांत हे सायकलपटू मुंबई मंत्रालयापर्यंत प्रवास करतील.
शहरातील पीडित, शोषितांसाठी निधी गोळा करण्यासोबतच सुंदर, पर्यावरणपुरक शहर गावांच्या निर्मितीसाठी सायकलचा अधिकाधिक वापर करण्यास सर्वसामान्यांना प्रोत्साहित करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्यामुळे अभिनेता आमीर खानही ठाणे ते मुंबई मंत्रालय या २५ कि.मी. अंतरात सहभागी होणार आहे.

माजी वायुसैनिक मिशन आॅलिम्पिक्स, लाईफ सायकलचे प्रमुख दीपक आत्राम, माजी एसटीएफ प्रमुख एसीपी पुरुषोत्तम चौधरी, मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, हेड काॅन्स्टेबल कमांडो ट्रेनर विजय धुर्वे, लाईफ सायकलचे साहसी सायकलपटू आकाश लुंगे, १३ वर्षीय ओम बेलोरकर हे सहा जण सायकल यात्रेत सहभागी होणार आहेत.

यात्रेच्या प्रारंभ स्थळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी, नागपूर मनपाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, गेटवेल रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. स्वर्णकार, मनोज सिंगरखिया तसेच आयएमएचे नागपुरातील सदस्य उपस्थित राहतील. तसेच राज्यातील ज्या जिल्ह्यातून ही यात्रा मार्गक्रमण करेल तेथील आयएमए सदस्य काही कि.मी. अंतर या साहसी सायकलपटूंना सोबत करतील. सायकलींगाचा राज्यात प्रचार प्रसार, स्वयंचलीत दुचाकी वाहनांच्या धोकादायक वाहतुकीबाबत जनजागृती, जीवनरक्षक कौशल्याबाबत जागृती, रस्त्यात लागणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये हृदयविकार निवारण प्रतिबंधांबाबत जागृती आणि शाळा महाविद्यालयीन मुलांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृत करणे हा देखील यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

अमरावतीहून १६ रोजी प्रस्थान
१५ रोजी सायंकाळी सायकल यात्रेचे अमरावती येथे आगमन होणार असून रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर सायकलपटू मालटेकडी अमरावती येथून सकाळी वाजता अकोल्याकडे प्रस्थान करणार आहेत. यादरम्यान आयएमएचे सदस्य काही अंतर सायकलपटूंना साथ देतील. दरम्यान जागोजागी हे साहसी सायकलपटू प्रबोधन करणार आहेत.

हृदयविकार निवारण प्रतिबंधाबाबत जागृती
रस्त्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये सायकलपटू हृदयविकार निवारणासाेबतच प्रतिबंधाबाबत जागृती करणार असून शाळा महाविद्यालयीन मुलांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल प्रबोधन केले जाणार आहे. पुण्यात २२ रोजी सकाळी ते या कालावधीत विविध कार्यालये महाविद्यालयांमध्ये प्रबोधन कार्यक्रम केले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...