आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीतील टोळीला पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दरोडाटाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील पाचजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पकडले. ही कारवाई विळद घाटात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी दुपारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टोगऱ्या पाच्या भोसले (५५) अक्षय ऊर्फ धरत्या टोगऱ्या भोसले (१८), ताज्या पाच्या भोसले (४६), संदीप चाच्या भोसले (२४, सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड) आणि महेश ऊर्फ काळ्या अर्मास भोसले (२५, भोरवाडी, ता. नगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले यांच्यासह पोलिस कर्मचारी दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, सागर सुलाने, नामदेव जाधव, बबन बेरड यांच्या पथकाने सापळा रचून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

दरोडा टाकण्याची, घरफोडी करण्याची साधने, लाकडी दांडके, मिरची पूड, एअरगन, सत्तूर, दोरी असा एकूण सुमारे हजार रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्यांच्याकडून नगर शहर परिसरातील अनेक चोऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपासाकरिता त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...