आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर दरोडा, महिलांनी आरडाओरड केल्याने दरोडेखोर फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शिवाजीनगर भागात असलेल्या एका घरात शिरलेल्या तीन आरोपींनी बंदुकीच्या धाकावर सिनेस्टाइल्स दरोडा टाकला. ही खळबळजनक घटना गुरुवारी भरदिवसा दुपारी वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार राजू तोडसाम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी सविस्तर असे की, शिवाजीनगर परिसरात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नानवानी यांचे घर आहे. गुरुवारी दुपारी घरात कुणी पुरुष मंडळी नसताना अज्ञात तीन दरोडेखोरांनी हातात बंदूक घेऊन त्यांच्या घरात अचानक प्रवेश केला. या वेळी घरातील महिलांवर थेट बंदूक रोखून ३० ग्रॅम सोन्याची चेन जबरीने हिसकावून नेली. या वेळी त्यातील एकाने पंकज यांच्या आईला लोखंडी रॉडने जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, त्यांनी आरडाओरड केली असता दरोडेखाेरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर घरातील महिलांनी बाहेर येऊन परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्या वेळी तीन तरुणांनी या दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, दरोडेखोरांनी पोबारा केला. या दरोडेखोरांच्या दुचाकीचा क्रमांक तरुणांनी मिळवला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोड पोलिस ठाणेचे ठाणेदार यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी संपूर्ण पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी त्या परिसरातील विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेऊन दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच घटनेतील आरोपींना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. असे असताना पुन्हा त्याच पद्धतीने थेट घरात शिरून सशस्त्र दरोडा टाकण्याची ही घटना घडल्याने गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच आरोपींची भरदिवसा दरोडा टाकण्यापर्यंत हिंमत वाढली असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचकच संपला असल्याचे या वेळी बोलल्या जात होते. तर चोरट्यांना धाक बसावा याकरीता आता येथील पोलिस यंत्रणेने धडक मोहीम हाती घेऊन चाेरट्यांना तत्काळ गजाआड करण्याची मागणी आता शहरातील नागरिकांकडून होत ओ.

बॅगेतूनदीड लाख लंपास : येथीलबसस्थानकातून यवतमाळ ते दारव्हा बसमध्ये चढत असताना प्रवासी जनेद अहमद खाँन इकबाल अहमद वय ४० वर्षे रा. किला वाॅर्ड रा. दारव्हा यांच्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोख लंपास केली. ही घटना बुधवार, २२ जून रोजी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून, वडगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील नागरिक एकापाठोपाठ एक घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. कसेही करून या चोरट्यांना पोलिसांनी गजाआड करून त्यांच्यावर धाक बसवण्याची गरज आहे अन्यथा शहरातील नागरिकांचा पोलिस प्रशासनाविरुद्ध रोष वाढणार आहे एवढे मात्र खरे.

शिवाजीनगरात बंदुकीच्या धाकावर दरोड्याची घटना घडली. या वेळी घटनास्थळी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. राजु तोडसाम यांनी भेट दिली. गृहराज्यमंत्री असलेल्या रणजित पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्याशी चर्चा करून चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले. तर ना. अहीर यांनी घरमालक नानवाणी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.

सात लाखांचे एलईडी बल्ब लंपास
वडगाव परिसरातील एका गोदामातून चक्क गोदाम प्रभारीनेच एलईडी बल्ब लंपास केले. बल्फचा संपूर्ण हिशेब घेण्यासाठी आलेल्या विभागीय व्यवस्थापक यांनी २२ जून रोजी रात्री १०.३० वाजता यवतमाळ येथील बल्ब गोदामाला भेट दिली. त्या वेळी जवळपास लाख ८५ हजार ९०० रुपयांचे एलईडी बल्ब लंपास असल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी गोदाम प्रभारी धीरज पुंडलिक गेडाम याच्याविरुद्ध वडगाव रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकंदरीत नागरिकांसाठी आजचा दिवस चोरीचा दिवस ठरला. एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे शहरामध्ये खळबळ माजली.

मध्यरात्री ज्वेलर्स फोडले
शहरातीलमध्यवस्तीत असलेल्या गिरीनगरातील देवगिरकर ज्वेलर्सचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दीड किलो चांदी बेंटेक्सचे दागिने, असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज २३ जून रोजी पहाटे वाजता उघडकीस आली. याप्रकरणी दीपक देवगिरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

घटनास्थळी मंत्र्यांनी दिली भेट
शिवाजीनगरातील पंकज नानवानी यांच्या घरी बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच या वेळी जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार राजू तोडसाम यांनी घटनास्थळी जाऊन नानवानी कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण माहिती घेतली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या गंभीर घटना आणि आज भरदिवसा पडलेला दरोडा या प्रकारावरून गृहराज्यमंत्री यांनी घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यात आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासोबत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या सूचनाही पोलिस अधिकाऱ्यांना राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...