आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; मुलगी जावयाने हत्या केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- शहरातील सीताबर्डी भागात सूटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मानसिंग शिव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मानसिंग यांची हत्या ही मुलगी आणि जावयाने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मानसिंग यांची मुलगी किरण आणि जावई विजय हे दोघे बेपत्ता असून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्या दोघांनीच ही हत्या केल्याचा दाट संशय आहे. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. किरण आणि विजयने ती सूटकेस काल (रविवारी) संध्याकाळीच एका मॉलमधून खरेदी केली होती. पोलिसांना याबाबत एक व्हिडिओ मिळाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
- नागपुरातील माटे चौकात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एक तरुण आणि तरुणी एक मोठी बॅग घेऊन जात होते.
- या दोघांनी दुर्गानगर स्टॅण्डवर रिक्षा पकडली आणि चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितले.
- परंतु बॅगचे वजन आणि दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रिक्षाचालकाने त्याबाबत विचारणा केली.
- रिक्षाचालकाने हटकल्याने घाबरल्याने तरुण-तरुणी बॅग तिथेच टाकून माटे चौकातून पसार झशले.
- रिक्षाचालकाने राणा प्रतापनगर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पहाटे तीनच्या सुमारास पोलिस स्टेशनमध्ये बॅग आणून ती उघडली असता, त्यात पुरुषाचा मृतदेह आढळला.
- पोलिसांना मुलगी आणि जावई बेपत्ता असून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्या दोघांनीच ही हत्या केल्याचा दाट संशय आहे.
बातम्या आणखी आहेत...