आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात पाणी आणेल ही घटना, अन्‍न, पाण्‍यावाचून हिला वर्षभर कोंडले होते अंधारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सासरच्‍या लोकांनी वर्षभर अंधा-या खोलीत डांबून छळ केल्‍यामुळे ही महिला जर्जर झाली होती. जयश्री दुधे असे या महिलेच नाव असून तिने अमरावतीच्‍या एका रुग्‍णालयात उपचार घेतला. आता या महिलेला सुटी झाली आहे. नांदेडमध्ये या महिलेला तिच्‍या सासरच्‍या मंडळींनी तब्‍बल वर्षभर एका खोलीत कोंडून ठेवले होते. तिच्‍याजवळ कुणालाही जाऊ दिले जात नव्‍हते. कित्‍येक महिने तिला अन्न पाणी न दिल्‍याने ती अत्‍यंत अशक्‍त झाली होती. कित्‍येक महिने तिला आंघोळही करता आली नाही. उपाशी राहल्‍यामुळे अंगात बोलायला शक्‍तीही न उरलेल्‍या या महिलेला उपचारानंतर सुटी देण्‍यात आली आहे. हा क्रुर प्रकार नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये घडला होता.
सासूने का दिली होती शिक्षा..
- जयश्रीचे माहेर हे अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गाव आहे.
- जयश्री कुराडे (माहेरचे नाव) हिचे माहूरमधील सुरेश दुधे यांच्याशी लग्न झाले होते.
- तीन वर्षांपूर्वी सुरेश यांचा एका अपघातात मृत्‍यू झाला.
- सुरेश हे कुऱ्हा येथे त्‍यांच्‍या सासरी काही कामानिमित्त आले होते.
- तेथून यवतमाळला परत जाताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
- ही दुर्घटना जयश्री हिच्‍या माहेरच्या लोकांमुळेच झाली आहे, असा आरोप तिच्‍या सासरच्या मंडळींनी केला. त्‍याची शिक्षा म्‍हणून सासरी सर्वानी तिचा छळ करण्‍यात सुरूवात केली.
छायाचित्र - मनीष जगताप..
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी खालावली होती जयश्री यांची प्रकृती..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...