आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराट हत्‍याकांड : मुलीशी प्रेमविवाह करणाऱ्या जावयाचा PSI ने केला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी एका पीएसआयची मुलगी शिक्षणासाठी अमरावतीत होती. तिचे शहरातील सचिन सिमोलिया नामक युवकाशी प्रेमसंबंध जुळले त्यांनी परस्पर विवाह केला. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. लग्नानंतर दीड महिन्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी-जावयाला पुसद येथे कट रचून बोलावले. सचिनचा गळा आवळून खून केला त्याचा मृतदेह जाळून टाकला. तब्बल साडेतीन महिन्यानंतर हा थरार उघड झाला असून, अमरावती शहर पोलिसांनी रविवारी (दि. ११) रात्री मुलीसह तिचे पीएसआय असलेले वडील, मुलीची आई, भाऊ आतेभाऊ यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलिसांत गुन्हा दाखल असल्यामुळे पाचही जणांना वाशीम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तुकाराम विठ्ठलराव ढोके (५२ रा. कारंजा लाड), तुषार तुकाराम ढोके (२३, रा. कारंजा लाड), प्रवीण दत्ताराव आगलावे (२४, रा. पुसद, यवतमाळ), शिवानी तुकाराम ढोके (२०) आणि पुष्पा तुकाराम ढोके (४६, दोघेही रा. कारंजा लाड) या पाच जणांना अमरावती पोलिसांनी वाशीम पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या पाचही जणांना खून खुनाचा पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये मानोरा पोलिसांनी अटक केली आहे. तुकाराम ढोके हे पोलिस उपनिरीक्षक असून सध्या वाशीम जिल्ह्यातील आसेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
मृतदेह जाळून तिघांनी केली अंघोळ
२५ मेच्या मध्यरात्री सचिनचा खून केल्यानंतर तुकाराम ढोके, तुषार आणि प्रवीण या अाराेपींनी मार्गावरील एका विहिरीवर अंघोळ केली. या वेळी गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरी व गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य जाळून टाकल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे जुळले प्रेम... आणि कसा केला खून...
बातम्या आणखी आहेत...