आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीपी शशिकुमार मीणा रुजू, गोंदियामध्ये २१ महिन्यांमध्ये ७० पोलिस शिपायांना केले होते निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस उपायुक्त म्हणून शशिकुमार मीणा हे सोमवारी (दि.२०)आयुक्तालयात रुजू झाले. आयपीएस मीणा यांनी पोलिस दलात आतापर्यंत सहा वर्षे सेवा दिली असून, साडेतीन वर्षे ते नक्षलग्रस्त भागात होते. २००९ च्या भारतीय पोलिस सेवा तुकडीचे अधिकारी असलेले मीणा यांचा परिक्षाधिन कालावधी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एएसपी म्हणून झाला आहे.

त्यानंतर मार्च २०१३ मध्ये त्यांची पदान्नतीवर गडचिराेली जिल्ह्यात नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून बदली झाली. त्यानंतर ऑगस्ट २०१४ ते मे २०१६ या काळात ते गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.गोंदियामध्ये २१ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकरणात दोषी आढळलेल्या तब्बल ७० ते ८० पोलिसांना निलंबित केले होते. त्यांची ही कारवाई चांगलीच चर्चेत राहिली होती. नक्षलग्रस्त भागातील साध्या चुकीचीही मोठी किंमत पोलिसांना चुकवावी लागते,त्यामुळेच ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सुरक्षेसह सुव्यवस्थेला प्राधान्य
अमरावतीत कामकरताना महिला सुरक्षेसह कायदा सुव्यवस्था कायम ठेवणे, गरजेनुसार प्राथमिक सुधारणा करणे, गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे , नागरिकांसोबत पोलिसांचा सुसंवाद राखणे आदी बाबींना प्राधान्य देण्यात येईल. शशिकुमार मीणा, पोलिसउपायुक्त.
बातम्या आणखी आहेत...