आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयाच्या टाक्यात आढळून आला मृतदेह, संशयास्पद मृत्यूची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- यवतमाळ मार्गावर बडनेरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जनुना गावात एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (दि. १६) सकाळी घरातीलच शौचालयाच्या टाक्यात आढळला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मृतक मागील पाच दिवसांपासून बेपत्ता होता. हा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. 

संतोष अभिमन्यु मोहोड (३७, रा. जनुना) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. संतोष मोहोड १२ एप्रिलपासून घरुन बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने लोणी पोलिसांकडे केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष बेपत्ता असल्याची नोंद केली होती. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी संतोषच्या घराच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी तसेच संतोषच्या कुटूंबियांनी दुर्गंधी कशाची आहे, म्हणून शोध घेतला तर संताेषच्या घरात नव्याने बांधलेल्या शौचालयाच्या पाण्याने भरलेल्या टाक्यात काहीतरी कुजले असल्याचे दिसत होते. त्यामुळे नागरीकांनी बारकाईने पाहणी केली तर त्यामध्ये संतोषचाच मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तातडीने ही माहीती लोणी पोलिसांना दिली. माहीती मिळताच लोणीचे ठाणेदार नागेश चतरकर पथकासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने नविन शौचालयाच्या पाणी भरलेल्या टाक्यातून मृतदेह बाहेर काढला. संतोषच्या पोटावर जखम असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी इर्विन रुग्णालयात आणला आहे. संतोष १२ एप्रिलपासून घरातून बेपत्ता होते. कुटूंबियांनी त्यांचा शोध घेतलाच असेल मात्र म़ृतदेह घरातील टाक्यात मिळून आला आहे. यातही त्यांच्या पोटाला जखम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज लोणी पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र तरीही पोलिसांना निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
 
शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा: संतोष मोहोडचा मृतदेह शौचालयाच्या टाक्यात मिळून आला. मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा असल्याचे लोणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार नागेश चतरकर यांनी सांगितले. 
 
खड्ड्याचे तोंड दीड फुट बाय दीड फुटाचे 
संतोष यांच्या घरी नव्याने शौचालय बाथरुम बांधण्यात आले आहे. हा खड्डा जवळपास ते फुट खोल तेवढाच रुंद लांब आहे. या खड्ड्यात पाणी भरले आहे, या खड्ड्याला अंदाजे दीड फुट बाय दीड फुट आकाराचे तोंड आहे. त्यामुळे या खड्ड्यात संतोष पडले कसे, जर पडले नसेल तर त्याठिकाणी पोहचले कसे, असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. 
बातम्या आणखी आहेत...