आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैनगंगा नदीत तिघांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये वाशिमचे दोन सख्खे भाऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृतकांमध्ये वाशिममधील दोन भावांचा समावेश आहे. अंकुर पाठक (वय 22), वैभव पाठक (वय 16) हे दोघे सख्खे भाऊ वाशिममधील आहेत. तिसरा गणेश अप्पलवार (वय 11, चंद्रपूर) याचाही मृत्‍यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्‍ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दर्शनासाठी एकत्र आले नातेवाईक..
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विदर्भाची काशी म्‍हणून हे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. आज सकाळी वाशिम जिल्ह्यातील पाठक परिवार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील अप्पलवार परिवार मार्कंडा येथे दर्शनासाठी आले होते. हे परिवार एकमेकांचे नातेवाईक होते. त्‍यामुळे त्‍यांनी या एकत्र येण्‍याचे नियोजन केले होते.
तीन मुलांसोबत तीन मुलीही गेल्‍या होत्‍या पोहायला..
मार्कंडा ऋषींच्‍या पुरातन मंदिरासमोर वैनगंगा नदी आहे. नदीपात्रात तीन मुले आणि तीन मुली आंघोळ करण्यासाठी उतरले होते. तिघे जण खोल पात्रात शिरले नि बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तिघांचे शव बाहेर काढले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...