आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमातील शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, यासाठी अर्ज करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आल्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
पुणे विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न मेघा कुलकर्णी यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, २०१५-१६ या वर्षात शिष्यवृत्तीसाठी आतापर्यंत एका लाख ५६ हजार अर्ज दाखल झाले असून या योजनेचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी अर्ज करण्याची मुदत ३० डिसेंबर, २०१६ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज योजनेंतर्गत आर्थिक प्रतिपूर्ती करण्यात येईल. त्याचबरोबर या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही ६ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विभागामार्फत आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...