आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: चुकीच्या पीक पद्धतीने उत्पादकतेत घट, आत्महत्यांत वाढ; असा हवा महाराष्ट्रात क्रॉप पॅटर्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रातील सध्याची पीक पद्धती (क्रॉप पॅटर्न) अत्यंत चुकीची असून पिकांची उत्पादकता कमी होण्याचे नेमके हेच कारण आहे. राज्यातील विविध भागातील ६० टक्के क्षेत्रातील पीक पद्धती तातडीने बदलणे अत्यावश्यक असल्याचा निष्कर्ष नागपुरातील राष्ट्रीय मृद सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो या केंद्रीय संस्थेने आपल्या अभ्यासातून काढला आहे.
 
जमिनीचा पोत आणि वातावरण पिकासाठी उपयुक्त नसताना केवळ लोकप्रिय आहे म्हणून पीक घेण्याचे राज्यातील मोठे प्रमाण अनाकलनीय असून त्यामुळे पिकांची उत्पादकता घटल्याने संकट निर्माण झाले असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडून त्याची परिणती आत्महत्यांमध्ये होण्यामागेही हे महत्वाचे कारण असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

महाराष्‍ट्रातील तील विविध भागासाठी योग्‍य पीक पध्‍दती
विदर्भ: कापूस नव्हे, तूर-ज्वारीस पोषक
संस्थेच्या मते विदर्भातील माती व हवामान कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादकतावाढीसाठी मुळीच पोषक नाही. त्याऐवजी विदर्भात ज्वारी आणि तुरीच्या संयुक्त पिकांना प्रोत्साहन देणे फायदेशीर राहील. बीटी कापूस आणि सोयाबीनसाठी जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण असणे आवश्यक आहे. मात्र, विदर्भात सर्व दूर मातीचे स्वरुप उथळ आहे. पूर्णा खोरे आणि सातपुडा पर्वतरांगांमुळे अमरावती जिल्हा सोडला तर जमिनीत पुरेशी आर्द्रता नसल्याने कापूस पीक घेणे फायदेशीर नाही, असे संस्थेने नमूद केले आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, मराठवाडा-खानदेशात कोणते पीक घेतले पाहिजे.. 
बातम्या आणखी आहेत...