आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून विवाहितेची बदनामी, मजनूला केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एका युवकाचे युवतीवर'सागरा'प्रमाणे अफाट एकतर्फी प्रेम होते. मात्र, त्याचे एकतर्फी प्रेम हे शेवटपर्यंत एकतर्फीच राहिले. दरम्यान, त्या युवतीचा मागील वर्षी दुसऱ्या युवकासोबत विवाह झाला. तिचा सुखी संसार सुरू होता. मात्र, 'ती मला भेटली नाही', ही भावना याच्या मनात सलत होती. त्या मुलीने आपल्याला नाकारले, याचा वचपा काढण्यासाठी त्याने फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे त्या युवतीच्या सासरकडील मंडळीला मेसेज करून बदनामी केली. या 'मजनू'चा शोध घेऊन सायबकर सेलने त्याला अटक करून सुखी संसारातला 'बिबा' बाजूला काढला आहे. अमरावती शहरातच पॉलिटेक्नीकला द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या एका युवकाचे युवतीसोबत एकतर्फी प्रेम होते. मात्र, गेल्या वर्षी त्या युवतीचा विवाह तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलासोबत करून दिला.
दरम्यान, या युवकाच्या मनात तिच्या बदनामीची भावना जागरूक झाली. त्यामुळेच त्याने फेब्रुवारी २०१६ ला फेसबुकवर अक्षय लोखंडे नावाने फेक अकाउंट तयार केले. या अकाउंटद्वारे त्या मुलीच्या पतीकडील नातेवाइकांना त्याने फेब्रुवारीला बदनामीकारक मेसेज टाकले. या प्रकारामुळे मुलीच्या माहेरील सासरकडील मंडळी विचलित झाली. त्यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी नागपुरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सेलचे प्रमुख कंचन पांडे संग्राम भोजने यांनी फेसबुक अकाउंटची तांत्रिक माहिती काढून कोणत्या सायबर कॅफेवरून अकाउंट उघडण्यात आले. त्याचा शोध घेतला. त्याआधारे सायबर कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन कुरापत करणाऱ्याला शोधले. तसेच त्याने दुसऱ्याच्या नावाने मोबाइल सिम कार्डसुद्धा खरेदी केले. दरम्यान मंगळवार, १५ मार्च रोजी रात्री सायबर सेलने सागरला ताब्यात घेतले. ही कारवाई पीआय दिलीप पाटील, सायबर सेलचे प्रमुख एपीआय पांडे, संग्राम भोजने, चैतन्य रोकडे अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. चौकशी अंती हे कृत्य आपणच केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...