आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्याच्या तोंडावर शहरात ३९५ शिकस्त इमारती उभ्याच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात सुमारे तीनशेच्यावर शिकस्त इमारती उभ्या असून पावसाळ्यात या इमारती केव्हाही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या इमारती पाडण्यासाठी नोटिसेस बजावण्यात आल्या असून त्या पाडण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत अाहे.
अमरावती महानगरात अनेक वर्ष जुन्या इमारती असून कोणत्याही स्थितीमध्ये कोसळण्याची स्थिती आहे. पावसाळ्यात अशा इमारती रहिवासी आणि आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरतात. ही बाब लक्षात घेता पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शिकस्त इमारती पाडण्याची कारवाई होणे आरंभ होणे आवश्यक होते. मात्र जून महिना मध्यात अाला असताना देखील जीर्ण इमारती पाडल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जुनाट ‘इमले’ कोसळून मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१० मध्ये महापालिका क्षेत्रात ९६ शिकस्त इमारती होत्या. महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने मागील सहा वर्षात शिकस्त इमारतींची संख्या तब्बल ३९५ वर पोहोचली आहे. सततच्या पावसामुळे मागील दोन वर्षांपूर्वी इंद्रभूवन थिएटरचा शाळेजवळील काही भाग कोसळला होता. अशाच अनेक इमारती भरवस्तीत असल्याने त्या नागरिकांसाठी धोक्याच्या ठरत आहेत.

निवासभोजनाची व्यवस्था : प्रकल्पातीलमुलांच्या निवासासाठी वसतीगृह असून येथे प्रशस्त खोल्यांमध्ये बिछाणे, कपडे, स्वच्छतागृहे, फर्निचर, वीज, पाण्याची सोय आहे. प्रशासकीय व्यवस्थापकाच्या नेतृत्वात मुख्य पर्यवेक्षकाच्या देखरेखीत पूर्णवेळ प्रशिक्षित कर्मचारी येथे मुलांची काळजी घेत असतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेला समतोल पोषक आहार मुलांना दिला जातो. खेळाडू तसेच पोषणाची कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आहाराचीही व्यवस्था केली जाते.

घरच्याप्रमाणे घेतली जाते मुलांची काळजी : प्रकल्पामध्येडाॅ. विजयकुमार सेठिया हे गत २२ वर्षांपासून स्वत: समर्पित भावाने आरोग्यसेवा देत आहेत. येथे रुग्णालय पूर्णवेळ निवासी स्त्री डाॅक्टरांची उपस्थिती असते. प्रकल्पात पोहोचल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. तसेच समुपदेशन स्वच्छता, निरोगी आरोग्याच्या सवयी विद्यार्थ्यांना लागाव्यात म्हणून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांचा आरोग्य, सुरक्षा, वैयक्तिक अपघात जन आरोग्य विमाही काढला जातो.

नऊवर्षांपासून प्रतिक्षा : स्थानिकबालाजी प्लॉट येथील श्री कालिका विद्याभवन ही इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत पाडण्याबाबत विदर्भ कासार समाज विकास मंडळाकडून २००८ पासून निवेदन दिले जात आहे. मात्र त्यावर नऊ वर्षांपासून कारवाई करण्यात आलेली नाही. राजापेठ ते अंबादेवी मार्गावर असलेली ही इमारत ७० वर्ष जुनी आहे.

जीर्ण इमारतीत कुटुंब : शहरातअनेक कुटुंब शिकस्त इमारतीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अश्या इमारतीत जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ नागरिकांवर येते. जीर्ण इमारतीमधून या नागरिकांना अन्यत्र हलवण्याची कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या लोकांना पावसाळ्याचे दिवस कठीण जातील.

प्रशासनाची कारवाई सुरू
^शिकस्त इमारत पाडण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींचे सर्वेक्षण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जीर्ण इमारती धारकांना त्या पाडण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. जीवन सदार, अतिरिक्तशहर अभियंता.

नऊ इमारतींची भर
शहरात आधीच मोठ्या प्रमाणात शिकस्त इमारती आहेत, त्यामध्ये यावर्षी नव्याने नऊ इमारतींची भर पडली आहे. शिकस्त इमारतींची संख्या जास्त असताना देखील केवळ दोन-तीन इमारती किंवा शिकस्त भाग पाडण्याचे काम महापालिकेकडून केले जाते.

पुढे काय होणार?
कारवाईची प्रतिक्षा : महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींची संख्या वाढत असताना पाडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ही स्थिती लक्षात घेता शिकस्त इमारती नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून शिकस्त इमारती पाडण्याबाबत कारवाईची प्रतिक्षा आहे.