आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळांचा राजा आंबा, ऊसाला वाढली मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उन्हाळ्यात खवय्यांचा तोंडाला पाणी सोडणारा आंब्याचा राजा आणि गरमीत थंडावा देणाऱ्या ऊसाची मागणी चांगलीच वाढली आहे. शहरात सध्या आंध्र प्रदेशातून दररोज आंब्याची आवक होत असून, आठवड्यातून एक दिवस रविवारी ऊसाची आवक होत आहे. एक महिना आधी एक ते दोड गाड्यांची आवक व्हायची तेथेच आता आठ ते दहा गाड्या ऊस आठवड्यातून एक दिवस येत आहे.
 
गावरानी ऊस ८०० ते एक हजार रुपये १०० नग या प्रमाणात ठोक बाजारात विकला जात आहे. त्याचप्रमाणे नगर पुणे येथून येणारा ऊस ठोक बाजारात ते रुपये किलो दराने विकला जात आहे.
सध्या सूर्य आग ओकायला लागल्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर काही वेळाने घशाला कोरड पडते. अशात मधूर शीतल पेय घेण्याची इच्छा होते. त्यामुळे आरोग्यदायी ऊसाचा रस घेण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढल्याने ऊसाचा रस धडाक्यात विकला जात आहे. त्यामुळेच ऊसालाही मागणी वाढली आहे.
 
ऊसासोबतच फळांचा राजा आंब्याच्या विविध प्रजातींचे बाजारात आगमन झाले असून यात बेंगळुरू हापूस, लाल परी, नीलम आंब्याची मागणी दिवसंदिवस जोर धरीत असून शहरभर गाड्यांवर, फळांच्या दुकानात तसेच चौका-चौकांमध्ये आंब्याची विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर आंब्याचा रसही शहरात धडाक्यात विकला जात आहे. एव्हाना आरोग्यदायी पेय घेण्याकडे कल वाढल्यामुळे रसाळ फळे, ऊसाला सध्या चांगले दिवस आले आहेत.
 
रविवारी होत असते ऊसाची आवक
शहरात दर रविवारी सकाळी आठ ते दहा गाड्या (४०७) गावरानी काळा नगर, पुणे जिल्ह्यातील हिरवट पिवळा ऊस येत असतो. हा ऊस आठवडाभर पुरतो. सध्या ऊसाच्या रसाला मागणी वाढल्यामुळे आवकही वाढली आहे.’’
- दिलीप वाठ, ऊसाचे एकमेव ठोक व्यापारी
बातम्या आणखी आहेत...