आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद साेमवार: कामठीच्या उर्दू शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - लोकशाहीची ओळख संस्कारक्षम बालवयातच करून देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेच्या उर्दू शाळेत दरवर्षी निवडणूक घेतली जाते. लोकशाही पद्धतीने रीतसर मतदान घेऊन ९ वर्गांमधून १८ प्रतिनिधी निवडले जातात आणि त्यांच्यातूनच मग अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर कार्यकारिणी निवडली जाते. अब्दुल सत्तार फारूकी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक नकीब अख्तर यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

नेहमी नावीन्यपूर्ण काहीतरी करणाऱ्या अख्तर यांनी िवद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही समजावून सांगायचे ठरवले. आणि त्यांनी निर्णय अंमलातही आणला.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, समित्यांचीही होते निवड
निवडून आलेल्या १८ जणांमधून शाळेच्या मैदानात अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होते. यासाठी सर्व िवद्यार्थ्यांचे पालक उपस्थित असतात. येथेही मतदान केले जाते. उर्वरीत िवद्यार्थ्यांची स्वच्छता प्रमुख, क्रिडा प्रमुख, शालेय पोषण आहार प्रमुख, प्रार्थना प्रमुख म्हणून निवड केली जाते.
मतपत्रिका, प्रचार अन‌् निकालानंतर मिरवणूकही
निवडणूक आयोगाप्रमाणे आधी कार्यक्रम जाहीर केला जातो. पहिली ते चौथीच्या एकूण ९ वर्गांतून प्रत्येकी चार विद्यार्थी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवतात. एका वर्गातून दोन याप्रमाणे १८ विद्यार्थी निवडून येतात. निवडणुकीतील उमेदवार रीतसर प्रचार करतात. प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका छापली जाते. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच येथेही विजयी उमेदवार विद्यार्थ्याची मिरवणूक काढली जाते.