आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उपायुक्त शशीकुमार मीणा होणार शुक्रवारी रुजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीपोलिस आयुक्तालयात डिसीपी (पोलिस उपायुक्त) म्हणून शशीकुमार मीना यांची आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. अमरावतीत रुजू होण्यासाठी आपण याच आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी येत असल्याचे डीसीपी मिना यांनी ‘दै. दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले.
शशिकुमार मिना हे २००९ च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत. मुळचे राजस्थानमधील असलेले मिना यांनी आपला परिविक्षाधीन कालावधी हा बुलढाणा जिल्ह्यात पुर्ण केला आहे. त्यानंतर बुलडाण्यातच त्यांनी एएसपी म्हणून काम पाहिले. त्यानंतर गडचिरोली येथे एएसपी आणि २०१३ ते २०१५ पर्यंत त्यांनी गोंदिया पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. गोंदियाला असताना मिना यांनी केलेल्या कारवाई प्रशासनावरील पकड चर्चेत राहिली आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान, अमरावती पोलिस आयुक्तालयातील दोन्ही डीसीपींची महिनाभरांपूर्वी बदली झाली आहे. त्यामुळे अमरावतीत रिक्त झालेल्या पदावर मिना यांची वर्णी लागली आहे. मिना अमरावतीत येणार किंवा नाही? याबाबत पोलिस वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मात्र मिना यांनी सोमवारी (दि. १३) ‘दिव्य मराठी’ला सांगितले कि, आपण येणार असून याच आठवड्यात रुजू होणार आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी ते अमरावतीत पदभार स्वीकारतील. मीणा यांच्या रुपाने तब्बल १२ वर्षांनंतर अमरावती आयुक्तालयाला आयपीएस अधिकारी मिळाले आहे.

खात्यात आल्यापासून विदर्भातच सेवा : शशिकुमारमीणा २००९ ला पोलिस खात्यात रुजू झाले. त्यावेळी त्यांनी बुलडाण्यातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सलग सात वर्ष त्यांनी विदर्भातच सेवा दिलेली आहे. त्यांनी आतापर्यंतही विदर्भाबाहेर सेवा दिलेली नाही. त्यामुळे मीणा अमरावतीत सुध्दा रुजू होणार आहे. अन्यथा वरीष्ठ पदावरील अधिकारी अमरावतीत येईपर्यंत येणार किंवा नाही, याबाबत शंकाच राहते. मात्र मिना यांचा सेवेतील इतिहास पाहता ते अमरावतीत येणारच आहे.