आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण, वनौपजासाठी कोटींचे बीज भांडवल, विकास वाटा मानव विकास अंतर्गत अर्थ सहाय्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मानवविकास कार्यक्रमांतर्गत गौण आणि वनौपजांचा उपभोग घेण्यासाठी कोटी १२ लाख रुपयांचे बीज भांडवल एकावेळी देण्याचे अर्थ सहाय्य म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ७२ गावांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी, तसेच मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणे आणि मानव विकासावर आधारित योजना राबवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रम राबवण्यात येतो. गौण वनौपज गोळा करण्यासाठी विकास कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ साठी मारेगाव १६ लाख (२ गावे), पांढरकवडा कोटी ५६ लाख (६४ गावे), घाटंजी ४० लाख (६ गावे) याप्रमाणे चार कोटी १२ लाख रुपयांचा निधी वितरण करण्यात आला आहे.
पेसा आणि वनहक्काची मान्यता कायद्यातील तरतुदीनुसार अनुसूचित क्षेत्रांतील गौण वनौपजे गोळा करणे तसेच लघु पाणी साठ्यातील मासेमारी करता यावी, यासाठी संबंधित ग्राम सभेला अथवा अनुसूचित जमाती इतर पारंपरिक वननिवासी यांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या योजनांव्यतिरिक्त उत्पन्न वाढ योजनांमध्ये गौण वनौपजांचा उपभोग घेण्यासाठी बीज भांडवल म्हणून झरी जामणी, आर्णी, घाटंजी केळापूर (पांढरकवडा) आणि मारेगाव तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार गौण, वनोपजे गोळा करण्यासाठी तसेच लघु पाणीसाठ्यातील मासेमारीचे हक्क वापरण्यात येत आहेत किंवा वापरले जाणार आहेत अशा गावाच्या ग्रामसेभेला अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. गौण वनौपजाचा वापर करताना वनौपजांचे संवर्धन करण्याची तयारीही ग्रामसभेने गटविकास अधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे दर्शवावी लागणार आहे.

सध्या राज्यात अनुसूचित क्षेत्रात हजार ८०० ग्रामपंचायती असून, त्यामध्ये हजार ९०० गावांचा समावेश होतो. या क्षेत्रांना पेसा कायदा तसेच वन हक्क कायद्याचे सर्व अधिकार लागू आहेत. पेसा कायद्यात समाविष्ट ५९ गटांपैकी ४५ गटांचा समावेश मानव विकास कार्यक्रमात होतो. या ४५ गटातील अनुसूचित क्षेत्रातील गावांना ही योजना लागू आहे. या योजनेतून ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे परंतु जेथे तेंदू किंवा बांबू व्यतिरिक्त इतर गौण, वनौपजांचा तसेच लघु पाणी साठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी लाख, ५०० लोकसंख्या असलेली गावे परंतु जेथे तेंदू किंवा बांबू व्यतिरिक्त इतर गौण वनौपजांचा तसेच लघु पाणी साठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी लाख, ५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे परंतु जेथे तेंदू किंवा बांबू आणि इतर गौण वनौपजांचा तसेच लघु पाणी साठ्यातील मासेमारीच्या व्यवसायासाठी लाख रुपये अर्थ सहाय्य देण्यात येते.

लाभ घेण्यासाठी ग्रामसभेने प्रस्ताव सादर करावा
वनहक्क कायदा आणि पेसा अंतर्गत गौण, वनौपजावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी गठीत गाव समित्यांना हे अर्थ सहाय्य देण्यात येते. या योजनेचा गावांना लाभ घ्यावयाचा असल्यास ग्रामसभेने त्यांच्या उपक्रमाचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर करावा. या प्रस्तावासोबत ग्रामसभेच्या निव्वळ नफ्याचा भाग शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून उभारलेल्या बीज भांडवलामध्ये जमा करण्याची तयारी असल्याचा ठराव जोडणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...