आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढते शहरीकरण अभिशाप नसून विकासाची नामी संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड/चांदूरबाजार - राज्यात उद्योगामुळे होणारे प्रदूषण केवळ १० टक्के, तर शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण हे ९० टक्के आहे. झपाट्याने वाढणारे शहरीकरण हा अभिशाप नसून, विकास करण्याची एक नामी संधी असल्याचे सांगून जनतेच्या हितासाठी जेवढे प्रस्ताव तयार करून पाठवाल ते सर्व प्रस्ताव मंजूर करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मात्र या प्रस्तावात विकासाच्या पंचसुत्रीचा समावेश करून पाठवा असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि चांदूरबाजार येथे नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यात जाहीर सभा घेत आहेत. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ अनिल बोंडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोंडाणे, वरूडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती आंडे, शेंदुरजनाघाटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रूपेश मांडवे मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, साफसफाई, आरोग्य, शिक्षण, रस्ते, आणि पिण्याचे पाणी या पंचसुत्रीचा विकासाच्या दृष्टीने प्रस्तावात समावेश असला पाहिजे. नगरपरिषदेत विजयी होणाऱ्या नगराध्यक्षांनी शहरीकरण विकासासाठी याच बाबीना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या अर्थ कारणात ६५ टक्के वाटा हा शहरातील अर्थ व्यवस्थेतून येतो. मात्र या पुर्वीच्या सरकारने शहरीकरणामुळे होणाऱ्या बदलासाठी कोणतेही ठोस नियोजन केले नाही. त्यामुळे शहरे भकास झाली. शहरातील घनकचरा आणि सांडपाण्याची कोणताही उपयोग केलेला नाही. परिणामी हे सर्व सांडपाणी जमिनीत मुरले आणि शेतजमिनीचा पोत खराब झाला. सर्वत्र प्रदूषण वाढले. म्हणून सर्व नगरपालिकांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांिगतले.
महिला बचत गट संकुला्च्या माध्यमातून बचत गटांचे मॉल उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी चांदूर बाजार येथील जाहीर सभेत बोलताना सांगितले. या मॉल मध्ये विविध बचत गटाच्या महिलांना रोजगार उपलब्द करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या सरकारच्या कामाचा आढावा देत १४० नगर पालिकेचे रखडलेले काम पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले.आणि महाराष्ट्रातील ३०० शहारापैकी दीड वर्षात १०० शहरे हागणदारीमुक्त झाली आहे, पुढच्या वर्षी डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हा हागणदारी मुक्त करू असा दावा मुख्यमंत्री यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांंची वरुड, चांदूर बाजार, येथे नगर परिषद निवडवणुकीकरीता प्रचार सभा आयोजित केल्या होत्या. वरूड च्या सभेनंतर दुपारी ठीक एक वाजता मुख्यमंत्री यांचे चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे आगमन झाले. त्यानंतर ते मोटार वाहनाने सराफा लाइन येथे पोहोचले.या सभेला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी , माजी महापौर किरण ताई महल्ले,किशोर मेटे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहरराव सुने,भास्कर दादा टोम्पे यांच्यासह नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार, तालुक्यातील भाजचे कर्यकर्ते गावकरी हजर होते.

आज पुन्हा तीन जाहीर सभा
गुरूवारी दि.२४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्यात पुन्हा तीन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मोर्शी, अचलपूर आणि अंजनगांव सुर्जी येथील प्रचार सभेला मुख्यमंत्री संबाेधित करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...