आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंतेत, पावसाअभावी करपत चालले 'हिरवे स्वप्न'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे- खरीपाच्या हंगामासाठी बळीराजाने पाहिलेले 'हिरवे स्वप्न' पाण्याअभावी करपत चालले आहे. वरुणराजा कोपल्यामुळे या हिरव्या स्वप्नावर ठेवलेल्या अपेक्षा कापुराप्रमाणे उडत चालल्या आहेत. पाऊस पडल्यास तालुक्यातील हातची पिके जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे दु:ख तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
महिनाभरापूर्वी तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. शेतकऱ्यांनी लगेच पेरण्या उरकल्या. परंतु, पेरण्या होताच पावसाने दडी मारली ती आजतागायत कायम आहे. पावसाअभावी पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पिकांचे कोवळे अंकुर नळामुळे करपू लागले आहेत. तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. आठ दिवसांत पाऊस आल्यास तालुक्यात भयंकर दुष्काळाला तोंड द्यावे लागण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कृषी विभागाने योग्य सल्ला द्यावा : कृषीविभागाने शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात योग्य सल्ला द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पेरण्या मोडण्यास सुरुवात
तब्बल तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्यामुळे कोरडवाहू पट्ट्यातील हलक्या जमीनीतील पिके सुकण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी पिके मोडण्यास सुरवात केली असून पेरणीची वेळ निघून गेल्यामुळे दुबार पेरणीही शेतकऱ्यांना शक्य होऊ शकणार नसल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या नोंदीनुसार अंदाजे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सुरवातीला आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या दडपल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाल्यामुळे या शेतकऱ्यांसह कोरडवाहू शेतकऱ्यांवर पेरण्या मोडण्याची पाळी आली आहे.
वरुणराजाला साकडे
पावसाने हजेरी लावावी म्हणून शेतकरी ग्रामदेवतेसह वरुणराजाला साकडे घालत आहेत. ठिबक सिंचनावर कपाशी आता विहिरी तळाला लागल्याने संकटात आली आहे. शेतमजूर काम नसल्याने शहरात स्थलांतर करत आहेत.
पशुधन विक्रीस
जून महिन्यात पेरणी झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यादृष्टीने उन्हाळ्यात केलेले चाऱ्याचे नियोजन कोलमडले आहे. गोठ्यातील चारा संपला आहे. पशुधनाचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे. त्यामु‌ळे पशुधन विक्रीस काढले आहे.
बातम्या आणखी आहेत...