आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीक्षाभूमीवर अाज उसळणार जनसागर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९५६ मध्ये दसऱ्याच्या दिवशी लाखो लोकांसह धम्माची दीक्षा घेतली. यानिमित्ताने दरवर्षी विजयादशमीला नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. या वेळीही या उत्सवात सहभागी हाेण्यासाठी देशभरातील धम्मानुयायांचा अाेघ दीक्षाभूमीवर सुरू झाला अाहे. गर्दी वाढत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यातच धम्मानुयायी येत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी काम सुरू केले आहे. शिवाय पोलिसांची कडक नजर राहणार आहे. १३०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. दीक्षाभूमी व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे थेट प्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण ११ अाॅक्टाेबर राेजी सह्याद्री वाहिनीवरून हाेणार आहे. रात्री ७.३३ ते ८.१५ या वेळेत हा कार्यक्रम हाेईल.
बातम्या आणखी आहेत...