आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1590 रुपयांचा ऑनलाइन हप्ता भरून श्रद्धा बनली कोट्यधीश; पंतप्रधान मोदींनी दिले बक्षिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा हिला 1 कोटी   रुपयांचे बक्षिस देण्यात आले आहे. - Divya Marathi
श्रद्धा हिला 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले आहे.
लातूर- नोटाबंदीनंतर सुरू झालेल्या कॅशलेस व्यवहाराचे फायदे अाता समोर येऊ लागले असून सामान्य घरातील श्रद्धा मोहन मेंगशेट्टे या तरुणीने अवघ्या १५९० रुपयांचा हप्ता ऑनलाइन भरून कोट्यधीश होण्याचा मान पटकावला आहे.  

नोटाबंदीनंतर सरकारने देशात डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेचे पहिले एक कोटीचे बक्षीस श्रद्धाने मिळवले आहे. शुक्रवारी तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात बक्षिसाचे वितरण करण्यात आले. 

श्रद्धा लातुरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासमोरील खंडोबा गल्लीत राहते. तिचे वडील गल्लीतच किराणा दुकान चालवतात. श्रद्धा ही सध्या पुणे येथे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला दुसऱ्या वर्षात शिकते.  श्रद्धाने नोटाबंदीच्या अगोदर काही दिवसांपूर्वी हप्त्यांवर एक मोबाइल खरेदी केला होता. त्याचा १५९० रुपयांचा हप्ता तिने रूपे डेबिट कार्ड स्वाइप करून भरला होता. लकी ड्रॉ योजनेत तिला पहिले एक कोटीचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ती आता जवळपास दीड हजार रुपयांत करोडपती झाली आहे. सदर योजनेत एक हजाराचीही अनेक बक्षिसे आहेत. परंतु शुक्रवारी नागपुरात प्रामुख्याने बंपर ड्रॉचे विजेते असणाऱ्या सहा प्रमुख भाग्यवंतांना पंतप्रधानांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.  

डिजिधन योजना ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन देण्याबरोबरच कॅशलेस व्यवहार वाढवून भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणण्यात आली आहे. ही योजना ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीही असून ग्राहक गटातून पहिले बक्षीस श्रद्धाने पटकावले आहे. शुक्रवारी श्रद्धा बक्षीस घेण्यासाठी आपल्या आईवडिलांसह नागपूरला गेली होती. त्यामुळे तिच्या घरी तिचा लहान भाऊच होता. श्रद्धाचे काका सोहन मेंगशेट्टे यांनी सांगितले की, श्रद्धाने एक कोटीचे बक्षीस जिंकल्याने घरात आनंदाचे वातावरण असून नातेवाईकही तिला भेटण्यासाठी येत आहेत. गल्लीतील नागरिकांनाही तिने जिंकलेल्या बक्षिसाबद्दल तिचा अभिमान वाटू लागला आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...