आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेत मालमत्तांचे डिजिटल कर मूल्यांकन, प्रत्येक मालमत्तेचा मिळेल यू-पिन क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील मालमत्तांवर आता डिजीटल कर अाकारणी केली जाणार आहे. जीआयएस मॅपींगचा आधार घेत शहराची सॅटेलाइट इमेज तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. नकाशा नुसार मालमत्तांचे डिजीटल रुपांतर करीत त्यानुसार कर आकारणी केली जाणार आहे. स्मार्ट सिटीस अनुरूप आधुनिक प्रणालीने कर आकारणी होणार असल्याने अवैध तसेच अतिरिक्त बांधकामास लगाम लागण्याची शक्यता आहे.
शहरात सद्य:स्थितीत असलेल्या लाख ४० हजार मालमत्तांचे डिजीटल मूल्यांकन कर आकारणी करण्याची मोहिम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. शहराचे मॅपींग करण्याचे कार्य देखील प्रारंभ करण्यात आले आहे. मॅपींग तसेच सॅटेलाइट छायाचित्रांचा आधार घेत मालमत्तांचे डिजीटलायझेशन केले जाणार आहे. शहराचे क्षेत्रफळ तसेच व्याप लक्षात घेता याकरता एक अँड्राॅइड अॅल्पीकेशन देखील तयार करण्यात आले आहे. टॅबमध्ये ही प्रणाली अंतर्भूत करणे शक्य अाहे. कंपनीकडून मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ, बांधकाम करण्यात आलेले क्षेत्रफळ, बांधकामाचे स्वरुप, मजले, पाणी आदी संपूर्ण माहिती प्रणालीत समाविष्ट केली जाणार आहे. सद्य:स्थितीत आकारल्या जाणाऱ्या पाणी, स्वच्छता आदी संपूर्ण करांचा त्यामध्ये समावेश केला जाणार आहे. मालमत्ता धारकांचा आधार कार्ड क्रमांक, इलेक्ट्रिक बील क्रमांक मोबाइल क्रमांक देखील या प्रणालीत समाविष्ट केले जाणार आहे. संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर त्याचा एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार असून, प्रत्येक मालमत्तेला युपीन म्हणजेच स्वतंत्र क्रमांक दिला

पुढे काय?
मालमत्तांचे डिजीटलाझेशन केल्यानंतर इमारतींबाबत स्थितीची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामध्ये बदल केल्याचे वाॅर्ड लिपीक अथवा अभियंत्यांना निरीक्षण करताना निदर्शनास येणार आहे.

माहिती ऑनलाइन नागरिकांना सुविधा
^जीपीएसप्रणालीद्वारे मालमत्तांची ओळख निर्माण करता येईल.शिवाय त्या मालमत्तेवर कर आकारणी करता येईल. या माध्यमातून सॉफ्ट कॉपीमध्ये डाटा निर्माण होईल. त्याआधारे कर मूल्यांकन वसूली करणे सुविधा जनक होईल. या माध्यमातून नागरिकांना देखील चांगली सुविधा मिळेल. हेमंतपवार, आयुक्त महापालिका.

शहरातील मालमत्ता
वर्ष मालमत्ता
२००५-०६लाख ३८ हजार
२०१५ लाख ४०, ७००
२०१६(अपेक्षीत) लाख ५० हजार
मार्च अखेर वसूल कर
प्रभागमागणी वसुली टक्के
उत्तरझोन ११३३५८०२० ९३४५७६०४ ८२.४४
मध्य झोन १२०५९६८३८ ८८४२०२०५ ७३.३१
पूर्व झोन ४११६२१२१ ३२४२००३५ ७८.७६
दक्षिण झोन ११५६४२७४५ ९११३९६३४ ७८.८१
पश्चिम झोन ३७१७५९८३ २०७६७१८४ ५५.८६
एकूण४२७९३५७०७ ३२६२०४६६२ ७६.२२
बातम्या आणखी आहेत...