आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकासह आठ लेटलतीफ शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घंटी वाजण्याची वेळ झाल्यानंतर देखील शिक्षकांचा पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या नेहरू मैदान येथील शाळेत उघडकीस आला. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडून पाहणी करण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकासह शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई ऑक्टोबरला प्रस्तावित करण्यात आली. 
 
स्थानिक नेहरू मैदान येथे ऐतिहासिक अशा इमारतीत महापालिकेच्या वतीने तीन शाळा चालवल्या जातात. हिंदी मुला-मुलींची तसेच एका मराठी प्राथमिक शाळेचा समावेश आहे. शाळेची वेळ झाल्यानंतर देखील शिक्षक शाळेत येत नसल्याचा प्रकार उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या समोर घडला. उपायुक्त वानखडे यांनी आज सकाळी ११.३० वाजता शाळेला भेट दिली. शाळेची वेळ झाली असताना मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित नसल्याने उपायुक्तांसह पथकाच्या ही गंभीर बाब समोर आली. शिवाय महापालिकेच्या शाळेची ऐतिहासिक असलेली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. एकीकडे शहरात ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान प्रशासनाकडून राबवले जात आहे. मात्र ऐतिहासिक वारसा स्थळ असलेली नेहरू मैदान शाळेच्या बाजूला सर्वत्र कचराच कचरा दिसून आल्याने उपायुक्तांनी नाराजी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...