आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dispute On Issue Of Kite Changed In Murder At Nagpur

नागपुरात पतंग पकडण्याच्या वादातून खून, साथीदार जखमी, आरोपी फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
नागपूर - पतंग पकडण्यावरून झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी ही घटना घडली. चंद्रशेखर वडतकर असे मृताचे नाव अाहे.
चंद्रशेखर, सागर गायकवाड व काही मित्र बिडपेठ येथील मैदानावर पतंग उडवत होते. ते दारूही प्यायले. तेथे कटलेला पतंग पकडण्यासाठी सागर धावला. दुसरे काही युवकही सरसावले हाेते. त्यांच्यात वाद होऊन त्यांनी सागरला मारहाण केली. त्यावेळी चंद्रशेखरने वाद सोडवताना एकाला थप्पड लगावली. तो युवक आपल्या आठ ते दहा साथीदारांना घेऊन मैदानावर आला. तेथे त्यांनी चंद्रशेखर व सागर या दोघांवर चाकूचे वार केले. घाबरलेला चंद्रशेखर पळून जात असताना एका खांबावर आदळून खाली पडला. मात्र शस्त्रधारी युवक त्याच्यावर तुटून पडले. यात चंद्रशेखर ठार झाला. तर सागर गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर युवक मोटारसायकलींनी पसार झाले. अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. यातील सागर हा कुख्यात गुन्हेगार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.