आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 1 कोटी 63 लाखांची वीज चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महावितरण कंपनीने जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते ३० जानेवारी २०१७ या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण कोटी ६३ लाखांची वीज चोरी पकडली असून, त्यापैकी अाजपर्यंत ५८ लाख २६ हजार रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील भरारी पथकासह नियमित कर्मचाऱ्यांनी धाडी टाकून ही वीजचोरी पकडली. यात सरळ चोरी अर्थात हुक टाकून, मीटरमध्ये फेरफार तसेच घरगुतीच्या नावावर कनेक्शन घेऊन उपयोग दुसऱ्या कामासाठी करणे, इतरांना वीज देणे याचा समावेश आहे. जिल्ह्यात सरळ चोरी अंतर्गत ४७४ लोकांची ६९ लाख ९५ हजाराची वीज चोरी धरण्यात आली. यापैकी २८५ लोकांनी ५८ लाख हजार रु. भरले. त्यापैकी ९७ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. १२६ कलमांतर्गत १३६ लोकांनी ९३ लाख ८५ हजारांची वीज चोरली. त्यापैकी ६८ लोकांनी १२ लाख २० हजार रु. भरले. ६८ लोकांची चौकशी सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...